गडचिरोली जिल्ह्यात एकूण आठ लाख 14 हजार 857 मतदार

32

जिल्ह्यात एकूण आठ लाख 14 हजार 857 मतदार

अंतिम मतदार यादी जाहीर

 

गडचिरोली,(s bharat news network)दि.02: भारत निवडणूक आयोगाने दिनांक 01 जुलै 2024 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमानुसार अंतिम मतदार यादी दिनांक 30 ऑगस्ट 2024 रोजी मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय 67- आरमोरी, 68- गडचिरोली व 69-अहेरी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय (सर्व) जिल्ह्यातील सर्व 972 मतदान केंद्राच्या ठिकाणी व जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

सदर अंतिम मतदार यादीमध्ये गडचिरोली जिल्ह्यातील एकुण 814857 मतदारांचा समावेश झालेला आहे. त्यामध्ये पुरुष मतदारांची संख्या- 409544, महिला मतदारांची संख्या- 405304 व तृतीयपंथी मतदार-9 असे एकुण मतदार 814857 मतदार यादीमध्ये समाविष्ट झालेले आहेत.

गडचिरोली जिल्ह्यातील तरुण मतदारांची संख्या-15774, अपंग मतदार एकुण 5963 आहेत. त्यापैकी पुरुष मतदार-3675 व महिला मतदार-2288 आहेत तसेच वयोवृद्ध मतदार -6686 याप्रमाणे आहेत. आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक मध्ये जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, गडचिरोली संजय दैने यांनी केले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here