वनविभागातील वनमजुर , वनरक्षक व वनपाल यांचे विविध समस्यांचे निवारण करणेबाबतची आढावा बैठक

176

वनविभागातील वनमजुर , वनरक्षक व वनपाल यांचे विविध समस्यांचे निवारण करणेबाबतची आढावा बैठक

S Bharat news network :- गडचिरोली वनवृत्तातील क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्याकरीता दिनांक 23.08.2024 रोजी डॉ . अजयभाऊ पाटील , केंद्रीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्य वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटना नागपूर , शाखा गडचिरोली यांचे नेतृत्वात मा . मुख्य वनसंरक्षक , गडचिरोली यांचे दालनात सभा आयोजीत केली होती . क्षेत्रीय कर्मचा – यांच्या तक्रारीबाबत बैठकीमध्ये सविस्तर चर्चा करून सर्व समस्यांचे तात्काळ निवारण करण्याबाबत मा  मुख्य वनसंरक्षक गडचिरोली श्री एस . रमेशकुमार यांनी संघटनेला आस्वाशीत केले . सदर बैठकीत खालील समस्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली .त्यात 1 . वनविभागातील कर्मचा – यांना विशेष कृती कार्यक्रम अंतर्गत एकस्तर पदोन्नतीचा लाभ व 15 टक्के प्रोत्साहन भत्ता 7 व्या वेतन आयोगानुसार देण्यात यावा 2 . बक्षी समितीचा खंड 2 लागू करण्यात यावा . 3. महाराष्ट्र नागरी सेवा जेष्ठतेचे विनियमन नियमावली 2021 लागू करण्यात यावी . 4. विभागीय चौकशी व निलंबन प्रकरणे निकाली काढण्यात यावे . 5. कर्मचा – यांचे सेवा पुस्तके अदयावत करण्यात यावे . 6. नियतक्षेत्रांचे पुर्नगठन करण्यात यावे . 7. वनरक्षक व वनपाल यांना मदतनिस देण्यात यावे . 8. सिरोंचा वनविभागातील कर्मचा – यांच्या वैदयकीय बिले मंजुर करण्यात यावे . 9. संगणक चालक यांचे पि.सी.सी. एफ कार्यालयातील ऑपरेटर प्रमाणे वेतन देण्यात यावे . 10. वनविभागातील वनवसाहत येथील इमारतीचे दुरूस्ती करण्याबाबत . 11. वन्यप्राणी व वन्यजीव व्यवस्थापन कार्यशाळा आयोजीत करणेबाबत . 12 वनमजूरांची सेवाजेष्ठता प्रकाशीत करणेबाबत . इत्यादी विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली . सदर सभेला वृत्त अध्यक्ष श्री सिध्दार्थ मेश्राम , केंद्रीय संघटक , श्री पुनम बध्दावार , भारत साबळे , सुनिल पेंदोरकर , किशोर सोनटक्के , सुबिनय सरकार , ईश्वर मांडवकर , अनंत ठाकरे , रूपेश मेश्राम , रवि जुवारे , नितेश तुमपल्लीवार , विकास शिवणकर व संघटनेचे पदाधिकारी , वनपाल , वनरक्षक , वनमजूर मोठ्या संख्येने उपस्थीत होते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here