29ऑगष्ट रोजी क्रीडा स्पर्धेचे  आयोजन

32

29ऑगष्ट रोजी क्रीडा स्पर्धेचे  आयोजन

गडचिरोली,(s bharat news network)दि.22:महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय,म.रा.पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली यांचे संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील क्रीडा संस्कृतीची जोपासना व खेळाडूंमध्ये क्रीडा वातावरण निर्माण होण्याच्या दृष्टीने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात दरवर्षी स्व.मे.ध्यानचंद, हॉकीचे जादूगार यांचे जन्म दिना निमीत्य राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय क्रीडा दिनाचे आयोजन मोठ्या प्रमाणात क्रीडामय वातावरणात करण्यात येते. त्याअनुषंगाने दि. 29 ऑगष्ट, 2024 रोजी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, क्रीडा व सांस्कृतिक भवन, कॉम्पलेक्स, गडचिरोली येथे करण्यात येणार आहे व याप्रसंगी स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांनी दि. 28 ऑगस्ट 2024 पर्यंत आपला प्रवेश जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे नोंदवावा व अधिक माहिती करीता कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे संपर्क साधावा. खालील तपशीलाप्रमाणे स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच दि. 29 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 09.00 वाजता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली येथुन रॅलीचे भव्य आयोजन करण्यात येत आहे.

खेळ बाबी

अ.क्र. मैदानी प्रकार इन्डोअर प्रकार Fun Activities

1 चालण्याची शर्यत बॅडमिंटन लिंबू शर्यत / सेक रेस

2 व्हॉलीबॉल बुद्धीबळ दोरी उडी मारणे

3 हॉकी (पॅनल्टी शुट आऊट) बास्केटबॉल (3V3) खो-खो

4 फुटसाल/मिनि फुटबॉल (3V3) टेबलटेनिस लगोरी, लंगडी

5 टेनिस बॉल क्रीकेट टग ऑफ वॉर Plank Challenge

वरील स्पर्धेत जास्तीत जास्त खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवावा. प्राविण्य प्राप्त खेळाडू / संघांना प्रोत्साहनात्मक बक्षीसे देऊन गौरविण्यात येईल असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे यांनी केलेले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here