वैद्यकीय महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया कोणत्याही परिस्थितीत याच सत्रापासून सुरू करा.वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांकडे आमदार डॉ देवरावज होळी यांची मागणी
मुंबई मंत्रालयात भेट घेऊन केली विनंती
गडचिरोली दिनांक २० ऑगस्ट मुंबई(mumbai)आपण अथक प्रयत्नातून गडचिरोली जिल्ह्याला शासकीय महाविद्यालय मिळवून दिले असून याच सत्रापासून प्रवेश प्रक्रिया सुरू व्हावी यासाठी सतत प्रयत्न करीत आहे परंतु काही तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे अजूनही प्रवेश प्रक्रिया संदर्भात अंतिम निर्णय झालेला नाही. त्यामुळे या संदर्भातील असणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करून प्रवेश प्रक्रिया सुरू करावी अशी मागणी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. हसनजी मुश्रीफ यांच्याकडे मुंबई मंत्रालयात भेट घेऊन केली. याप्रसंगी लोकसभा समन्वयक प्रमोदजी पिपरे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी मंत्री महोदयांनी याच सत्रापासून प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याबाबत व त्यातील असणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करण्याबाबत संबंधितांना निर्देशित केले.