“कोया किंग अँड क्वीन” स्पर्धेचे आयोजन.राष्ट्रीय आदिवासी महिला फेडरेशन जिल्हा शाखा गडचिरोली व आदिवासी सामाजिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने.
धानोरा रोडवरील महाराजा लॉन येथे कार्यक्रमाचे आयोजन
गडचिरोली:-दि.०४ ऑगस्ट जागतिक आदिवासी व क्रांती दिनाचे औचित्य साधुन राष्ट्रीय आदिवासी महिला फेडरेशन(नारीशक्ती)जिल्हा शाखा गडचिरोली व आदिवासी सामाजिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आज धानोरा रोडवरील महाराजा लॉन मध्ये राष्ट्रीय स्तरावर गोंडी राणी मनीषा प्रस्तुत कोया किंग अँड क्वीन आदिवासी कल्चरल मॉडेलिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.स्पर्धेचे उद्घाटन राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री माननीय श्री डॉ.धर्मरावबाबा आत्राम यांच्या पार पडले,अध्यक्षस्थानी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवरावजी होळी तर प्रमुख अतिथी म्हणुन भाजपा जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष सौ. योगीताताई पिपरे,महिला व बाल रुग्णालय जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माधुरी किलनाके,राष्ट्रवादी युवक काँगेसचे जिल्हाध्यक्ष लीलाधर भरडकर,देशोन्नती जिल्हा आवृत्ती प्रमुख अनिल धामोडे,माजी जि.प.अध्यक्ष समय्या पसुला, मोनाली सहारे,डॉ.सोनल कोवे,कुळसेंगे,प्रतिभाताई चौधरी व इतर मान्यवर उपस्थित होते.यावेळी अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.धर्मरावबाबा आत्राम,आमदार डॉ. देवरावजी होळी,माजी नगराध्यक्ष सौ.योगीताताई पिपरे yogita tai pipare यांनी मार्गदर्शन केले.
*याप्रसंगी आयोजकाच्या वतीने सौ.योगीताताई पिपरे यांचा वृक्ष व पुष्पगुच्छ देवुन सत्कार करण्यात आला.*
*कार्यक्रमाचे आयोजन मिसेस इंडिया २०२१ ची विजेती मनीषा मडावी यांनी केले,व्यवस्थापक लक्ष्मी कन्नाके तर सुत्र संचालन सागर आत्राम,अन्नपूर्णा मेश्राम यांनी केले.*