मतदान अधिकाऱ्यांची सरमिसळ प्रक्रिया पूर्ण जिल्ह्यात ५००५ मतदान अधिकाऱ्यांची निवड तर २६८३ राखीव

166

मतदान अधिकाऱ्यांची सरमिसळ प्रक्रिया पूर्ण जिल्ह्यात ५००५ मतदान अधिकाऱ्यांची निवड तर २६८३ राखीव

*कोणत्या विधानसभा मतदार क्षेत्रात सेवा देणार ते ठरले

 

गडचिरोली दि.2 S,Bharat news network : लोकसभा निवडणुकीकरिता मतदान अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची द्वितीय सरमिसळीकरणाची (रॅण्डमायझेशन) प्रक्रिया आज पूर्ण करण्यात आली.

निवडणूक निरीक्षक अनिमेष कुमार पराशर, जिल्हा निवडणूक अधिकारी संजय दैने, उपजिल्हा निवडणूक अधिकारी विवेक घोडके, नोडल अधिकारी प्रशांत शिर्के व विवेक साळुंखे, जिल्हा विज्ञान व सूचना अधिकारी एस.आर.टेंभूर्णे तसेच राजकीय पक्षाचे प्रतिनिधी सुनिल चडगुलवार, भारत खटी आदी यावेळी उपस्थित होते.

मतदान केंद्राध्यक्ष, सहायक केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी क्रमांक २ व मतदान अधिकारी क्रमांक ३ यांची सरमिसळ प्रक्रिया जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राष्ट्रीय सूचना केंद्रात संगणक प्रणालीद्वारे पूर्ण करण्यात आली. यात जिल्ह्यातील आरमोरी, गडचिरोली व अहेरी या तीन विधानसभा मतदारसंघाकरिता एकूण ५००५ मतदान अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली तर २६८३ कर्मचारी राखीव ठेवण्यात आले आहेत. यात आरमोरी क्षेत्राकरिता १५७१ पुरूष व १९ महिला, गडचिरोली क्षेत्राकरिता १८५२ पुरूष व २२ महिला तर अहेरी विधानसभा क्षेत्राकरिता १५२१ पुरूष व २० महिला मतदान अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे.

संबंधीत विधानसभा मतदार क्षेत्रात मतदान केंद्रनिहाय अधिकारी नियुक्त करण्यासाठी त्या-त्या विधानसभा मतदार क्षेत्रनिहाय पुन्हा सरमिसळीची अंतिम प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here