सिटीसी गडचिरोली येथे विविध विकास कामांचे उद्घाटन समारंभ व पोलीस अधिकारी यांचा बदली निरोप समारंभ पार पडला

163

सिटीसी गडचिरोली येथे विविध विकास कामांचे उद्घाटन समारंभ व पोलीस अधिकारी यांचा बदली निरोप समारंभ पार पडला

दिनांक २४/०८/२०२३ रोजी सीटीसी किटाळी येथे विविध विकास कामांचे उद्घाटन समारंभ मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा. यांच्या हस्ते पार पडले. यामध्ये जवानांचे शौर्य दर्शविणारा कमांडो स्टॅच्यूचे अनावरण, एलएमजी फायरबट मोर्चा, फायरबट क्र. २ चे नुतनीकरन व लेक्चर हॉल नुतनीकरन उद्घाटन पार पडले. तसेच गडचिरोली जिल्ह्यात कार्यकाळ पूर्ण केलेल्या १०५ पोलीस अधिकारी यांची इतर जिल्ह्यामध्ये बदली झाल्याने त्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम पोलीस मुख्यालय येथील शहिद पांडू आलाम सभागृह येथे पार पडला.

गडचिरोली जिल्ह्यामध्ये विविध पोस्टे / उपपोस्टे / पोमकें तसेच शाखेमध्ये कार्यरत असलेले ०१ पोलीस निरीक्षक, ३ सहा. पोलीस निरीक्षक व १०१ पोलीस उपनिरीक्षक यांची बदली झालेली आहे. याबद्दल मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा. यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. सत्कार कार्यक्रमप्रसंगी बदली झालेल्या पोलीस अधिकारी यांनी आपल्या मनोगतात गडचिरोली जिल्ह्यामध्ये काम करीत असतांना आलेले अनुभव कथन केले. तसेच गडचिरोली सारख्या नक्षल प्रभावीत जिल्ह्यात कशाप्रकारे आव्हानांना सामोरे जावे लागते व याठिकाणी केलेल्या खडतर कामाचा अनुभव नक्कीच भावी वाटचालीसाठी उपयोगी पडेल व गडचिरोली पोलीस दलाचे आभार व्यक्त केले. यावेळी मा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. अनुज तारे सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता सा., मा. अपर पोलीस अधीक्षक अहेरी श्री. यतिश देशमुख सा. यांनी उपस्थित अधिकारी यांना मार्गदर्शन केले व भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या व शेवटी अध्यक्षीय भाषणात मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा. यांनी उपस्थित अधिकारी यांना मार्गदर्शन करुन शुभेच्छा दिल्या व आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की, याठिकाणी आपण बजावलेल्या उत्कृष्ठ कामगिरीकरीता मी आपले अभिनंदन करतो व भविष्यात देखिल आपण अशीच कामगिरी करुन महाराष्ट्र पोलीस दलाचे नाव उंचवाल अशी माझी अपेक्षा आहे.

सदर बदली निरोप समारंभ कार्यक्रमामध्ये मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. अनुज तारे सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता सा., मा. अपर पोलीस अधीक्षक अहेरी श्री. यतिश देशमुख सा. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कुरखेडा, श्री. साहील झरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी पेंढरी श्री. मयुर भुजबळ, उपविभागीय पोलीस अधिकारी हेडरी श्री. बापूराव दडस, उपविभागीय पोलीस अधिकारी, भामरागड श्री. नितिन गणापूरे, उपविभागीय पोलीस अधिकारी, एटापल्ली श्री. सुदर्शन राठोड, उपविभागीय पोलीस अधिकारी, जिमलगट्टा सुजीतकुमार क्षिरसागर व सर्व शाखा प्रभारी अधिकारी हे उपस्थित होते.सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता सर्व शाखा प्रभारी अधिकारी व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here