आलापल्ली अत्याचार प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा द्या-भाजप महिला आघाडीच्या जिल्हा प्रभारी योगीताताई पिपरे यांची मागणी
Gadchiroli गडचिरोली :- दि. 14 जुन
एटापल्ली तालुक्यातील आदिवासी अल्पवयीन मुलीवर आलापल्ली येथे झालेल्या अत्याचार प्रकरणाचा सखोल तपास करून यात दोषी आरोपींना कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या जिल्हा प्रभारी तथा former president municipal council gadchiroli yogita pipare माजी नगराध्यक्ष योगिताताई पिपरे यांनी केली आहे.
शालेय कामानिमित्त आल्लापल्ली येथे गेलेल्या एका अल्पवयीन आदिवासी मुलीवर रोशन गोडसेलवार व निहाल कुंभारे या दोन नराधमांनी तिला दारू पाजून तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला हा अत्यंत संतापजनक प्रकार असून ही अतिशय निंदनीय घटना आहे. जिल्ह्यातील आदिवासी मुलींवर अत्याचाराचे कृत्य सातत्याने घडत आहेत ही बाब अतिशय गंभीर असून महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्ह्यात अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढतच असून पोलिस विभागाने अशा अमानवीय कृत्य करणाऱ्या दोन्ही दोषींवर विविध कलमान्वये गुन्हा नोंद करून कठोर शिक्षा देण्याची मागणी भाजप महिला आघाडीच्या जिल्हा प्रभारी तथा माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे यांनी केली आहे.