चारीत्र्यावर संशय घेवुन जिवे ठार मारणाऱ्या पतीस जन्मठेप व 10,000/- रू. दंडाची शिक्षा
👆युट्युब वरील बातमी साठी क्लिक करा
गडचिरोली येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश,श्री. उदय बा. शुक्ल यांचा न्यायनिर्णय
District court gadchiroli
गडचिरोली :- दि 09/05 सविस्तर वृत्त असे कि, यातील आरोपी नामे शामराव रुषीजी शेंडे वय 38 वर्ष, रा. मुडझा ता. जिल्हा गडचिरोली याचे सोबत यातील मयत नामे निरंजना हिचे विवाह अंदाजे 15 वर्षापुर्वी जाती रिवाजानुसार झाले होते. लग्नानंतर तिन चार वर्षा पासुन आरोपीला दारूचे व्यसन लागले तेव्हा पासुन आपल्या पत्नीचे चारीत्र्यावर संशय घेवुन नेहमी झगडा भांडण करायचा या त्रासाला कंटाळुन मयत हि आपले मुलांनसह आई वडीलाकडे राहावयास आली होती. अंदाजे 2 वर्ष राहील्यानंतर आरोपी हा तिथे येवुन मी यापुढे निरंजना हिस त्रास देणार नाही असे बोलून तीला आपले घरी घेवुन गेला. परंतु काही दिवसातच त्यांचेत पुन्हा झगडा भांडण सुरू झाले. बरेचदा शामरावला समजावुन सांगीतले परंतु त्याचेत काहिच सुधारणा झाली नाही.
फिर्यादी हा आपले घरी दिनांक 29/09/2020 रोजी रात्री दरम्यान जेवन करून झोपले असता त्याचे जावयाचा पुतण्या यांनी फोन करून सांगीतले की, काका शामराव हा काकु हिचे सोबत झगडा भांडण करून निरंजना हिचे डोक्यावर कुल्हाडीने वार करून गंभीर जखमी केले आहे. तेव्हा रात्रीच मौजा मुडझा येथे येवून पाहिले असता निरंजना हि भिंतीलगत रक्ताचे धारोळयात पडलेली दिसली तिचे डोक्यावर उजव्या कानाचे मागे कुन्हाडीने मारल्याचे जखम दिसुन येत होते. तिला सामान्य रूग्णलय गडचिरोली येथे नेले असता डॉक्टरनी तपासून मृत घोषीत केले.
माझे जावई निरंजना हिचे चारीत्र्यावर संशय घेवुन कुन्हाडीन वार करून जिवानिशी ठार केले. अशी तक्रार आरोपी विरोधात मृतकाचे वडील यांनी पोस्टे गडचिरोली येथे दिल्याने अप.क्र. 438/2020 कलम 302 भादवी अन्वये गुन्हा नोदं करण्यात आला.
पोलीस यंत्रणेने कौशल्यपूर्ण तपास करून आरोपी विरुध्द सबळ पुरावा मिळून आल्याने मा. न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले. फिर्यादी व ईतर साक्षीदारांचे बयाण तसेच सरकारी पक्षाचा युक्तीवाद मा. न्यायालयाने ग्राहय धरून दिनांक 09/05/2023 रोजी आरोपी शामराव रुषीजी शेंडे वय 38 वर्ष, रा. मुडझा ता. जिल्हा गडचिरोली याला मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, श्री. उदय बा. शुक्ल गडचिरोली यांनी कलम 302 भादवी मध्ये जन्मठेप व 10,000/- रूपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली.
सरकार पक्षातर्फे सहा. जिल्हा सरकारी वकील श्री. एस. यु. कुंभारे, श्री. एन. एम. भांडेकर यांनी कामकाज पाहिले तसेच गुन्हाचा तपास पोनि प्रदीप वसंतराव चौगावकर व सपोनि शरद मेश्राम पोस्टे गडचिरोली यांनी केला आहे. तसेच संबंधीत प्रकरणात साक्षदारांशी समन्वय साधुन प्रकरणाची निर्गती करीता कोर्ट पैरवी अधिकारी व कर्मचारी यांनी खटल्याच्या कामकाजात योग्य भुमीका पार पाडली.