Employment fair of surrendered Naxal members completed through Gadchiroli Police Force

146

गडचिरोली पोलीस दलामार्फत आत्मसमर्पीत नक्षल सदस्यांचा रोजगार मेळावा संपन्न

आत्मसमर्पीत  नक्षल सदस्यांना विविध कार्डचे वाटप.

गडचिरोली। 06/05/2023 :- जिल्हा पोलीस दलासमोर आत्मसमर्पीत होवुन मुख्यप्रवाहात आलेल्या नक्षल सदस्यांचे जलद पुनर्वसन करण्यासाठी व त्यांना रोजगारांच्या संधी उपलब्ध करण्याकरीता जिल्हा प्रशासनाच्या मदतीने गडचिरोली पोलीस दल सदैव प्रयत्नशिल असते. त्याचाच एक भाग समर्पीत सदस्यांना सर्व सामान्यासारखे जीवन जगता यावे व समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्याकरीता व त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवुन देण्यासाठी मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा. यांचे मार्गदर्शनाखाली दिनांक 06/05/2023 रोजी आत्मसमर्पीत सदस्यांचा मेळावा पार पडला.
यावेळी मोठ¬ा संख्येने आत्मसमर्पीत नक्षल सदस्य उपस्थित होते. याप्रसंगी त्यांना कास्ट सर्टीफीकेट, (जातीचे प्रमाणपत्र), अंत्योदय शिधा पत्रिका, ड्रायÏव्हग लायसन्स, ई-श्रम कार्ड, समर्पीत कल्याण कार्ड, कामगार संघटना कार्ड, जॉब कार्ड, आरोग्य कार्ड अशा प्रकारचे विविध कार्डचे वाटप करण्यात आले. उपस्थित कार्यक्रमात आत्मसमर्पीत सदस्यांना मार्गदर्शन करतांना मा. पोलीस अधीक्षक सा. यांनी नक्षलवादाचा हिंसक मार्ग सोडुन लोकशाहीच्या मुळ प्रवाहात आल्याबद्दल सर्वप्रथम सर्व उपस्थित आत्मसमर्पितांचे अभिनंदन केले.तसेच एक भारतीय नागरिक म्हणून आवश्यक सर्व प्रकारचे प्रमाणपत्र, विविध योजनांचा लाभ उपलब्ध करुन देण्यास पोलीस प्रशासन व जिल्हा प्रशासनाच्या वतीने करणे शक्य आहे ते आम्ही करण्याचा प्रयत्न करीत आहोत असे सांगितले.
आत्मसमर्पण योजना सन 2005 मध्ये सुरु झाली असुन आजपर्यंत एकुण 657 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. त्यांच्या पुनर्वसनाकरीता “नवजीवन वसाहतीची” स्थापना करुन 174 भुखंडापैकी 150 भुखंड आत्मसमर्पीतांना वाटप करुन नवजीवन वसाहतीमध्ये 33 सदस्यांचे घरकुल बांधकाम पुर्ण झालेले असुन 14 सदस्यांचे घरकुल प्रगतीपथावर आहे. तसेच नवजीवन वसाहतमध्ये आत्मसमर्पीतांसाठी सुविधा म्हणुन प्रत्येक घरी नळ, विज, व पथदिवे तसेच समाज मंदिर (गोटुल), माऊली मंदिर चे बांधकाम करण्यात आले. तसेच पाणी पुरवठा योजना, नाली बांधकाम ईत्यादी पायाभुत सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.
तसेच आत्मसमर्पीतांना रोजगाराची संधी उपलब्ध होणेकरीता 2 बचत गट स्थापन करुन, 10 महिला व 02 पुरुष सदस्यांना “फ्लोअर क्लीनर फिनाईल ” तयार करण्याचे एमगिरी वर्धा यांच्या मदतीने प्रशिक्षण दिले. सद्या आत्मसमर्पीत सदस्यांचे 2 बचत गट हे फ्लोअर क्लीनरच्या व्यवसायातुन आत्मनिर्भर झाले आहेत. आत्मसमर्पीत पुरुषांना चारचाकी व दुचाकी वाहन प्रशिक्षण देण्यात आले. त्याचबरोबर एकात्मिक आदिवासी विभाग प्रकल्प गडचिरोली यांचे मदतीने “न्युक्लीएस बजट” योजने अंतर्गत 86 आत्मसमर्पीत सदस्यांना 50 हजार रु. चे अर्थसहाय्य व्यवसाय उभारण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात आले. रोजगार मेळाव्याच्या माध्यमातुन 76 जॉब कार्ड, 34 सदस्यांचे ई-श्रम कार्ड, 39 आत्मसमर्पीत सदस्यांचे महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे कार्ड, 641 आधार कार्ड, 146 पॅन कार्ड, 161 राशन कार्ड, 128 घरकुल वाटप, नवजीवन वसाहत येथे 350 रोपांचे वृक्षारोपन, व शिक्षणाकरीता मुक्तविद्यापीठामध्ये 27 सदस्यांचे प्रवेश करुन देण्यात आले आहेत. तसेच पोलीस दल व मैत्री परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आतापर्यंत एकुण 31 आत्मसमर्पीत नक्षल सदस्यांचे सामुहिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातुन लग्न करुन देण्यात आले व आजपावेतो 34 आत्मसमर्पीत नक्षल सदस्यांची नसबंदी रिओपनिंग करुन देण्यात आली आहे.
यावेळी कार्यक्रमास मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा. , मा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. अनुज तारे सा., मा. अपर पोलीस अधीक्षक ( प्रशासन) श्री. कुमार चिंता सा., मा. अपर पोलीस अधीक्षक अहेरी श्री. यतिश देशमुख सा. उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आत्मसमर्पण शाखेचे प्रभारी अधिकारी श्री. सागर झाडे व पोलीस अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here