युवा परिवर्तन की आवाज मुंडन आंदोलन घरपट्टी मिळवण्यासाठी युवा परिवर्तन की आवाज ने केले मुंडन आंदोलन

84

युवा परिवर्तन की आवाज मुंडन आंदोलन घरपट्टी मिळवण्यासाठी युवा परिवर्तन की आवाज ने केले मुंडन आंदोलन

Mundan Andolan carried out by the youth to get land

Rajat delate reporter Nagpur  (रजत डेकाटे प्रतिनीधी नागपुर)- . दि.आज २७ रोजी संविधान चौक येथे युवा परिवर्तन की आवाज द्वारे हिंगणा तालुक्यातील सातगाव मधील विस्थापित लोकांना घर मिळवून देण्याकरिता मुंडन आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन युवा परिवर्तन की आवाज चे प्रमुख निहाल पांडे यांच्या नेतृत्वात घेण्यात आले यावेळी प्रामुख्याने अमित भोसले, अजय भाऊ खुदसूनगे, सुनील भाऊ चोखारे, अहमद भाऊ कादर, रुपेश नागोसे, वर्ष काकडे, दया कचुवा, सोनू चाचाने इत्यादी उपस्तीत होते. यावेळी प्रदीप रामटेके, शरद विश्वास, निखिल कापटे यांनी मुंडन करून पालिका मंत्री यांचा निषेध केला.

 

बिगर झालेल्या लोकांनी म्हटले आम्ही बेघर झालो, आमचे मतदान घेणारे सरकार आमची मूलभूत गरज आमच्या हक्काचा निवारा देत नाही. आम्ही रस्त्यावर मागील 3 दिवस पासून झोपत आहो, आणी आमचे पालकमंत्री मा. महाराष्ट्र राज्य उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस नागपुर मध्ये येऊन सुद्धा आमच्या समस्या कड़े लक्ष देत नाही. त्यामुळे पालकमंत्री आमच पालकत्व स्वीकार करत नसल्याने आम्ही मुंडन आंदोलन करून पालकमंत्री चा निषेध करत आहो.

 

ती सरकारच्या दुर्लक्षांनी सत्तारित लोक मागील तीन दिवसापासून संविधान चौकात ठिय्या ठोकून बसली आहे. त्यांच्याबरोबर लहान मुलं महिला व वयोवृद्ध लोक देखील आहेत. मागील तीन दिवसापासून त्यांना सतत ऊन पाऊस याचा मारा झेलाव लागून राहिला आहे. ह्या लोकांची मागणी आहे की त्यांना त्वरित राहण्याकरता पर्यायी व्यवस्था करून देण्यात यावी .सरकारने त्यांच्या मागणी वरती त्वरित लक्ष देऊन त्यांच्या राहण्याची व्यवस्था करून देण्यात आली अशी मागणी निहाल पांडे यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here