सशक्त मन – सशक्त पिढी – मजबूत राष्ट्र उभारणी. प्रा.सुरेश खादीपुरे
नागपुर:- सशक्त शरीरात सशक्त मनाचे वास्तव्य असते आणि मनाला विशिष्ट पद्धतीने प्रशिक्षण देऊन जीवनात सकारात्मक बदल घडवून आणता येतात, सकारात्मक मानसिक शक्तीच्या बळावर सशक्त राष्ट्रही घडवता येते, असे प्रतिपादन सहायक प्राध्यापक सुरेश खादीपुरे सर, अण्णासाहेब गुंडेवार यांनी केले. महाविद्यालयातील आजीवन अध्ययन व विस्तार विभागातर्फे आयोजित “आरोग्य विज्ञान क्षेत्रातील तथा जीवन प्रशिक्षण क्षेत्रातील रोजगाराच्या संधी” या विषयावर अतिथी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गजानन पाटील सर यांनी मार्गदर्शन केले तसेच या क्षेत्रातील रोजगाराच्या शक्यतांची नाविन्यपूर्ण माहिती दिली आणि व्याख्यानाचे आयोजक व विभागप्रमुख, सहाय्यक व्याख्याते डॉ. मनोज मडावी सर यांनी पारंपारिक ज्ञान आणि जीवन अध्यापन आणि अभ्यासक्रम डिजिटल स्वरूपात पुढे नेण्याच्या गरजेवर भर दिला. या कार्यक्रमाचे संचालन अंजली पणीकर, आभारप्रदर्शन शिया तिवारी, पाहुण्यांचे स्वागत संचित मिसाळ, मुस्कान पासवान, कशिश जांभुळकर, स्वाती ठाकरे, मुस्कान गुप्ता, मुसफेरा व दानिया यांच्या वतीने करण्यात आले. विभागाच्या सदस्या डॉ. नीता शर्मा, डॉ. मंजुषा ठाकरे, डॉ. कांचन ठ. करे मॅडम तसेच सर्व प्राध्यापकांच्या उपस्थितीत अतिथी व्याख्यान सत्र यशस्वी झाले