दत्ताजी डिडोळकरांचे नाव देण्याचा ठराव रद्द करणार – कुलगुरू डॉ. बोकारे यांचे लेखी आश्वासन वसंतराव कुलसंगे यांचे उपोषण मागे

250

दत्ताजी डिडोळकरांचे नाव देण्याचा ठराव रद्द करणार – कुलगुरू डॉ. बोकारे यांचे लेखी आश्वासन वसंतराव कुलसंगे यांचे उपोषण मागे.

The resolution to name Dattaji Didolkar will be canceled – Vice-Chancellor Dr. Bokare’s written assurance, Vasantrao Kulasange’s hunger strike called off

गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठ सभागृहाला दत्ताजी डिडोळकर यांचे नाव देण्याचा विद्यापीठ सिनेटच्या ठरावाला कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी स्थगिती दिली असून हा ठरावच रद्द करण्याचा प्रस्ताव सिनेटच्या पुढील सभेत ठेवण्याचे लेखी आश्वासन त्यांनी आज दिले.

त्यामुळे डिडोळकरांचे नाव रद्द करावे या मागणीसाठी आदिवासी कार्यकर्ते वसंतराव कुलसंगे यांनी सुरू केलेले आमरण उपोषण आज मागे घेण्यात आले. कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी आज दुपारी तीन वाजता उपोषण मंडपाला भेट देऊन या बाबतचे पत्र कुलसंगे यांना सुपूर्त केले व त्यांना निंबू पाणी पाजून उपोषणाची सांगता केली.

या प्रसंगी गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अनिल हीरेखन, रिपब्लिकन पक्षाचे केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत, डॉ. दिलीप बारसागडे, बीआरएसपी चे प्रभारी राज बंसोड , अभारीपचे हंसराज उंदीरवाडे , ठाणेदार अरविंद कुमार कतलाम, आदिवासी एम्प्लॉयीस फेडरेशन चे सदानंद आराम, आदिवासी कर्मचारी संघटनेचे नेते माधवराव गावड, आदिवासी युवा विकास परिषदेचे कुणाल कोवे इत्यादी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.

गोंडवाना विद्यापीठ सभागृहाला दत्ताजी डिडोळकर यांचे नाव दिल्यावरून जिल्ह्यातील बराच आदिवासी दलित व बहुजन संघटनांनी तसेच राजकीय पक्षांनी तीव्र विरोध केला होता. चंद्रपूर, अमरावती, यवतमाळ, नागपूर, भंडारा इत्यादी जिल्ह्यातूनही या नामकरणाचा निषेध सुरू होता.

अशातच आदिवासी कार्यकर्ते वसंत कुलसंगे यांनी दिनांक 26 जानेवारी पासून विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच आमरण उपोषणाला सुरुवात केली . उपोषणाला देखील समाजाच्या विविध स्तरातून व्यापक पाठिंबा मिळत होता. अनेक राजकीय ,सामाजिक संघटनांचे नेते व सिनेट सदस्यांनी पहिल्या दिवसापासूनच उपोषण मंडपाला भेट देऊन आपला पाठिंबा जाहीर केला होता.

डिडोळकर यांच्या नावाला होत असलेला विरोध लक्षात घेता शेवटी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर बोकारे यांनी आज दुपारी उपोषण मंडपाला भेट दिली व सर्व कार्यकर्त्यांच्या समक्ष नामकरणाचा ठराव रद्द करण्याचे लेखी आश्वासन देऊन कुलसंगे यांचे उपोषण संपवले.

याप्रसंगी सुद्धा चौधरी , प्रदीप भैसारे, साईनाथ पुंगाटी , नागसेन खोब्रागडे, प्रतीक डांगे, नामदेव उसेंडी , पोर्णिमा कुलसंगे, वासुदेव कोडापे, विनोद मडावी , शोभा खोब्रागडे, धनश्याम खोब्रागडे लँकेश मडावी , डेव्हिड पेंद्राम , बादल मडावी , नीता सहारे, वंदना झाडे, अशोक खोब्रागडे, कविता खोब्रागडे व अन्य बरेच कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here