Entries and books for the State Literary Award competition should be sent

101

Entries and books for the State Literary Award competition should be sent

राज्य वाङ्मय पुरस्कार स्पर्धेसाठी प्रवेशिका व पुस्तके पाठविण्यचा कालावधी 1 ते 31 जानेवारीपर्यंत

गडचिरोली,(Gadchiroli)दि.30:मराठी भाषेतील उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीसाठी प्रकाशन वर्ष 2022 करिता राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारांसाठी प्रवेशिका जिल्हाधिकारी कार्यालयात ( मुंबई श्हर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळून) तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात 1 ते 31 जानेवारी 2023 पर्यंत पाठविता येणार आहेत.

दिनांक 1 ते 31 डिसेंबर 2022 कालावधीत प्रकाशित झालेली प्रथम आवृत्ती पुस्तके या स्पर्धेसाठी पात्र आहेत. या स्पर्धेची नियमावली व प्रवेशिका सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ,रवींद्र नाट्य मंदिर इमारत,दुसरा मजला,सयानी मार्ग,प्रभादेवी,मुंबई 400025 यांच्या कार्यालयात तसेच जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात (सर्वसाधारण शाखा अथवा करमणूक शाखा)विनामूल्य उपलब्ध होतील.महाराष्ट्र शासनाच्या www.maharastra.gov.in या संकेतस्थळावर ‘नवीन संदेश’ या सदरात स्व. यशवंतराव चव्हाण राज्य बाह्यय वाङ्मय पुरस्कार 2022 नियमावली व प्रवेशिका या शीर्षाखाली व ‘What’s new’ या सदरात Late Yashwantrao Chavan State Literature Award 2022 Rules Book and Application Form या शीर्षाखाली व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या http://sahityamarathi.gav.in या संकेतस्थळावर प्रवेशिका व नियमपुस्तिका उपलब्ध होतील.

प्रवेशिका पूर्णत:भरुन आवश्यक साहित्यासह सचिव,महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात 1 ते 31 जानेवारी 2023 या विहित कालावधीत पोहचतील अशा बेताने पाठवाव्यात.लेखक व प्रकाशक या स्पर्धेसाठी प्रवेशिका दाखल करु शकतात. मुंबई शहर व मुंबई उपनगर या दोन जिल्ह्यातील लेखक व प्रकाशकांनी पुस्तकांच्या दोन प्रतीसह विहित नमुन्यातील प्रवेशिका सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ,रवींद्र नाट्य मंदिर इमारत,दूसरा मजला,सयानी मार्ग,प्रभादेवी, मुंबई 400025 येथे पाठवाव्यात.मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळून अन्य ठिकाणच्या लेखक व प्रकाशकांनी जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये हे साहित्य दिनांक 1 ते 31 जानेवारी 2023 या विहित कालावधीत पाठवावे,लेखक /प्रकाशकांनी मंडळाकडे प्रवेशिका व पुस्तक पाठविताना सदर बंद लिफाफयावर/ पाकीटवर ‘स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार 2022 साठी प्रवेशिका असा स्पष्ट उल्लेख करावा.प्रवेशिका व पुस्तके स्विकारणाचा अंतिम दिनांक 31 जानेवारी,2023 हा राहील.विहित कालमर्यादेनंतर येणाऱ्या प्रवेशिका स्पर्धेसाठी स्विकारल्या जाणार नाहीत,असे आवाहन सचिव,महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ,मुंबई यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here