पूरबुडीच्या मदतीपासून वंचित राहिलेल्यांना मदत मिळणार आमदार डॉ देवरावजी होळी यांनी विचारलेल्या प्रश्नांला मंत्री शंभुराजे देसाई यांचे उत्तर
Minister Shambhuraje Desai’s answer to the questions asked by MLA Dr Devraoji Holi will help those who are deprived of the help of Purbudi
गडचिरोली जिल्ह्यातील सततच्या महापूर व अतिृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत करा- आमदार डॉ देवराव जी होळी यांची मागणी
पुरबुडीच्या मदतीपासून वंचित ठेवणाऱ्या मात्र नुकसान न झालेल्या आपल्या लोकांना मदत मिळवून देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा
नागपुर- Nagpur -Gadchiroli:-गडचिरोली जिल्ह्यामध्ये दरवर्षी ५-७ वेळा महापुराच्या परिस्थितीमुळे व अती पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत असल्याने त्यावर कायमस्वरुपी उपाययोजना करण्याची आवश्यकता असून शासनाने अशा नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी व नुकसान न झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळवून देणाऱ्या अधिकाऱ्यावर व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आमदार डॉ देवरावजी होळी यांनी विधानसभेत केली.त्यावर जे लोक अजूनही या पूरबुडीच्या मदतीपासून वंचित आहेत त्यांना मदत देण्यासंदर्भात संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना निर्देशित करण्यात येईल तसेच ज्यांचे नुकसानही झालेले नाही अशा शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देणारे अधिकारी व कर्मचारी यांची विभागीय चोकशी करण्यात येईल असे आश्वासन राज्याचे मंत्री शंभुराजे देसाई यांनी आमदार डॉ देवरावजी होळी यांनी विधानसभेत केली.गडचिरोली जिल्ह्यामध्ये दरवर्षी ५-७ वेळा महापुराची परिस्थिती निर्माण होऊन शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होते. पाऊस नेहमीच ६५ मिली.पेक्षा जास्त पाणी पडत असतो, मध्यप्रदेश, छत्तीसगड, राज्यातील पुराच्या पाण्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील वैनगंगा नदीच्या तीरावरील शेतकऱ्यांना नेहमीच नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळे आपण शेतकऱ्यांना किती वेळ मदत करणार हे स्पष्ट करून महापुराच्या तसेच ज्यांचे नुकसानही झालेले नाही अशा शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देणाऱ्या अधिकाऱ्यावर व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करणार काय? असा प्रश्न आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी विधानसभेत राज्याचे मंत्री शंभूराजे देसाई यांच्याकडे उपस्थित केला असता त्यांनी पूरबुडीच्या मदतीपासून वंचित राहिलेल्यांना मदत नक्कीच मिळेल असे आश्वासन दिले.