Conducted Elephant Disease Management Training at Porla

97

पोर्ला येथे हत्तीरोग विकृती व्यवस्थापन प्रशिक्षण संपन्न

Conducted Elephant Disease Management Training at Porla

गडचिरोली,(Gadchiroli )दि.27: राष्ट्रीय हत्तीरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत हत्तीरोग रुग्ण देखभाल व काळजीबाबत विकृती व्यवस्थापन व प्रतिबंधात्मक प्रशिक्षण प्रा.आरोग्य केंद्र पोर्ला येथे संपन्न झाला. डॉ.कुणाल मोडक यांनी हत्तीपाय रुग्ण ग्रेड 3 ते 7 या रुग्णांना विकृती व्यवस्थापनाबद्दल व पुढे येणाऱ्या विकृती टाळण्यासाठी रुग्णांना बोलते करुन त्याच्यांशी चर्चा करुन त्यांच्या शंकाचे निराकर केले.व रुग्णांना मोलाचे मार्गदर्शन केले.प्रशिक्षणामध्ये पोर्ला प्रा.आरोग्य केंद्र अंतर्गत सर्व गट प्रर्वतक व आशा स्वयंसेविका हजर होत्या.तसेच उपस्थित सर्व हत्तीरोग रुग्णांना विकृती व्यवस्थापनाबाबत जागतिक आरोग्य संघटना समन्वयक विभाग नागपूर, श्रीमती,त्रिवेदी मॅडम,यांनी कार्यशाळेत प्राशिक्षण देऊन मार्गदर्शन केले.  जागतिक आरोग्य संघटना राज्य समन्वयक राजेंद्रकुमार सिंग यांनी प्रत्यक्ष रुग्णांची आस्थेने विचारणा करुन सर्व रुग्णांना पायधुनी ( विकृती व्यवस्थापन) प्रात्याक्षिकाद्वारे व व्यायामाबाबत कार्यशाळेमध्ये हत्तीरोग रुग्णांना आणि उपस्थित सर्व कर्मचारी,आशा स्वयंसेविका,गटप्रर्वतक यांना मार्गदर्शन व समुपदेशन केले.तसेच सर्व हत्तीरोग रुग्णांना हत्तीरोग विकृती व्यवस्थापन किटचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.  कार्यशाळा व प्रशिक्षणाचे सुत्र संचालन आरोग्य सहाय्यक व्ही.आर.नैताम यांनी केले,कार्यक्रमाचे प्रास्तविक जिल्हा हिवताप अधिकारी,डॉ.कुणाल मोडक यांनी केले.आभार प्रर्दशन पर्यवेक्षक,श्री.एडलावार यांनी केले.कार्यशाळेला वैद्यकीय अधिकारी,प्रा.आ.केंद्र,पोर्ला डॉ.पी.गेडाम मॅडम,हत्तीरोग निरिक्षक,सी.बी.कुनघाडकर,हत्तीरोग कार्यालयाचे कर्मचारी व प्रा.आ.केंद्र,पोर्ला येथील कर्मचारी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here