The demand of MLA Dr Devraoji Holi to give university jobs to the children of farmers who become landless in the land acquisition of Gondwana University has been successful.

84

गोंडवाना विद्यापीठाच्या भूसंपादनात भूमिहीन होणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाल्यांना विद्यापीठ नौकरी देणार आमदार डॉ देवरावजी होळी यांच्या मागणीला यश

The demand of MLA Dr Devraoji Holi to give university jobs to the children of farmers who become landless in the land acquisition of Gondwana University has been successful.

 

गोंडवाना विद्यापीठाच्या जमिनींचे भूसंपादन येत्या ३ महिन्यात पूर्ण होणार

राजभवन नागपूर येथे महामहिम राज्यपाल यांचेकडे झालेल्या बैठकीत निर्णय

आमदार डॉ देवरावजी होळी यांच्या आग्रहाने वनमंत्री मा.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी लावली गोंडवाना विद्यापीठाच्या जमिनीच्या अधिग्रहण संदर्भात महामहीम राज्यपाल महोदयांकडे बैठक

ओलिता खाली येत असलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीला कोरडवाहू जमिनीचा लाभ न देता ओलिताखालचा लाभ देण्यात यावा आमदार महोदयांची विनंती

Nagpur नागपूर :-गोंडवाना विद्यापीठाच्या भूसंपादनात भूमिहीन होणाऱ्या गरीब शेतकऱ्यांच्या पाल्यांना विद्यापीठात कामावर सामावून घ्यावे ही आमदार डॉ देवरावजी होळी यांची मागणी मान्य करण्यात आली असून त्यांच्या पाल्यांना शैक्षणिक पात्रतेनुसार विद्यापीठांमधील कामात सामावून घेण्यात यावे व पुढील ३ महिन्यात विद्यापीठाच्या जमिनींचे भूसंपादन पूर्ण करावे असे निर्देश महामहीम राज्यपाल भगतसिंगजी कोश्यारी यांनी जिल्हाधिकारी व कुलगुरु यांना राजभवन नागपूर येथे गोंडवाना विद्यापीठाच्या जमीन अधिग्रहण संदर्भात झालेल्या बैठकीत दिले.आमदार डॉ देवरावजी होळी यांच्या आग्रहाने वनमंत्री मा.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे विनंती वरून गोंडवाना विद्यापीठाच्या जमिनीच्या अधिग्रहण संदर्भात महामहीम राज्यपाल महोदयांनी राजभवन नागपूर येथे बैठकीचे आयोजन केले. बैठकीला राज्याचे वनमंत्री नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार आमदार डॉक्टर देवरावजी होळी ,महसूल विभाग, भूसंपादन व वनविभागाचे प्रधान सचिव, नागपूर विभागाच्या विभागीय आयुक्त, गडचिरोलीचे जिल्हाधिकारी, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू ,कुलसचिव, राज्यपालांचे सचिव, यांचासह संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. गोंडवाना विद्यापीठाच्या जमिनीच्या भूसंपादनाचा प्रश्न व समस्या मार्गी न लागल्यास आपण हिवाळी अधिवेशनात नागपुर येथे विधिमंडळाच्या पायऱ्यावर बसून आंदोलन करू असा इशारा आमदार डॉ देवरावजी होळी यांनी प्रशासनाला दिला होता. त्या मागणीची दखल घेऊन वनमंत्री ना. सुधिरभाऊ मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात महामहीम राज्यपाल यांच्या उपस्थितीत राजभवन मुंबई येथे गोंडवाना विद्यापीठाच्या समस्यासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले.  याप्रसंगी आमदार महोदय यांनी कोरडवाहू जमीन निश्चित केलेल्या मात्र प्रत्यक्षात ओलिताखालील येत असलेल्या उर्वरित शेतकऱ्यांना कोरडवाहू जमिनीचा लाभ न देता ओलिताखालचा लाभ देण्यात यावा अशी विनंती राज्यपाल महोदयांना केली असता त्यांनी याबाबत सदर बाप तपासून शेतकऱ्यांना न्याय द्यावा असे निर्देश प्रशासनाला दिले. गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली करिता मौजा अडपल्ली येथील ७८.९५ हेक्टर आर खाजगी जमीन खरेदी करण्याकरिता तात्कालीन मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस व वित्तमंत्री ना सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी ९२ कोटी,१८ लक्ष १३ हजार ८२३ रूपये दिले होते. मिळालेल्या रकमेमधून जमिनीचे भूसंपादन करण्यात यावी याकरिता आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी शासन स्तरावर वारंवार पाठपुरावा केला. मात्र २०२२ संपत असतानाही जमिनीच्या अधिग्रहणाची प्रक्रिया पूर्णपणे पार पाडण्यात आली नाही त्यामुळे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी विद्यापीठ तथा जिल्हा प्रशासनाला इशारा दिला होता. त्यानंतर लागलीच जमिनीच्या अधिग्रहणाची भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आतापर्यंत ६२% जमिनीचे भूसंपादन करण्यात आले असून जवळपास २८ कोटी २५ लक्ष रूपयांपेक्षा अधिक रक्कम शेतकऱ्यांना वितरित करण्यात आली असल्याची माहिती या बैठकीच्या प्रसंगी देण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here