विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक श्रीमती विजयलक्ष्मी बिदरी यांचा गडचिरोली जिल्हा दौरा 

86

विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक श्रीमती विजयलक्ष्मी बिदरी यांचा गडचिरोली जिल्हा दौरा

 

गडचिरोली,(Gadchiroli)दि.01: दिनांक 01 जानेवारी 2023 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम सुरु असून श्रीमती विजयलक्ष्मी बिदरी, विभागीय आयुक्त, नागपूर विभाग, नागपूर यांना मतदार यादी निरीक्षक (Electoral Roll Observer) म्हणून नियुक्त केले आहे. भारत निवडणूक आयोग यांचेकडून प्राप्त सुचनेनुसार दिनांक 01 जानेवारी 2023 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीचे विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाच्या संपुर्ण कालावधीत मतदार यादी निरीक्षक यांना जिल्हा निहाय एकूण तीन भेटी द्यावयाच्या आहेत. त्यामध्ये विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाचे दावे व हरकती सादर करण्याच्या कालावधीत पहिली भेट द्यावयाची आहे. त्याअनुषंगाने श्रीमती विजयलक्ष्मी बिदरी, मतदार यादी निरीक्षक तथा विभागीय आयुक्त, नागपूर विभाग, नागपूर हे दिनांक 06 डिसेंबर 2022 रोजी गडचिरोली जिल्ह्यात पहिली भेट देणार आहेत. सदरचे भेटी दरम्यान उक्त विषयाबाबत खासदार, आमदार तसेच मान्यताप्राप्त राजकीय पक्षाची सभा तसेच मतदार नोंदणी अधिकारी यांची दिनांक 06 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 11.00 वाजता सभा घेणार आहेत. असे जिल्हा निवडणूक अधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here