अधिवेशनापूर्वी गोंडवाना विद्यापीठाच्या जमिनीचा प्रश्न निकाली न काढल्यास विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करणार आमदार डॉक्टर देवरावजी होळी
उपविभागीय अधिकारी यांची भेट घेऊन केली चर्चा
मागील अनेक वर्षांपासून पैसे मंजूर असूनही अजून पर्यंत विद्यापीठाच्या जमिनीचा प्रश्न मार्गी न लागणे हे अत्यंत दुःखद
गडचिरोली :- gadchiroli :- तात्कालीन मुख्यमंत्री ना देवेंद्रजी फडणवीस व वित्तमंत्री ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर गोडवाना विद्यापीठाकरिता अडपल्ली गोगाव येथे जमिनीसाठी निधी मंजूर करण्यात आला व मंजूर निधी उपलब्धही झाला मात्र अजून पर्यंत त्या जमिनीच्या हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण न होणे ही अत्यंत दुःखद बाब आहे. त्यामुळे येत्या अधिवेशनापूर्वी गोंडवाना विद्यापीठाच्या या जमिनीचा प्रश्न निकाली न काढल्यास विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी प्रशासनाला दिला आहे.
गोंडवाना विद्यापीठाच्या जमिनीकरिता निधी उपलब्ध झाल्यानंतर आत्तापर्यंत ३ कुलगुरू व ३ जिल्हाधिकारी बदलून गेले. परंतु विद्यापीठाच्या जमिनीचा प्रश्न निकाल लागलेला नाही. त्यामुळे ही अत्यंत गंभीर बाब आहे. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने ही प्रक्रिया पूर्ण होत नसल्याचे ते म्हणाले. त्यामुळे आता याकडे तातडीने लक्ष देऊन विद्यापीठाच्या जमिनीचा प्रश्न निकाली काढावा अन्यथा आपण येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये या विरोधात विधानसभेच्या पायऱ्यावर बसून आंदोलन करणार असल्याचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी म्हणाले.