नक्षलवाद्यांच्या वतीने खंडणी वसुल करणाऱ्या नक्षल समर्थकांना अटक
गडचिरोली :- Gadchiroli :-दिनांक २ डिसेंबर ते ८ डिसेंबर २०२२ रोजी होणाऱ्या नक्षलवाद्यांच्या पीएलजीए सप्ताहाच्या पार्श्वभुमीवर मा. पोलीस अधीक्षक श्री नीलोत्पल . यांचे मार्गदर्शनाखाली मा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. अनुज तारे . यांचे नेतृत्वात नक्षलविरोधी अभियान तीव्र करण्यात आले असुन, उपविभाग अहेरी अंतर्गत उपपोस्टे पेरमिली हद्दीत नक्षलवाद्यांच्या वतीने खंडणी वसुल करणाऱ्या १० नक्षल समर्थकांना गडचिरोली पोलीस दलाने अटक केली आहे.
नक्षल सप्ताह दरम्यान नक्षलवादी शासन विरोधी योजना आखुन खंडणी वसुल करणे, रहदारी बंद करणे, नक्षल स्मारक बांधणे, जाळपोळ करणे तसेच इतर गंभीर स्वरूपाच्या घटना घडवून आणत असतात. हीच संधी साधुन नक्षल समर्थक नक्षलवाद्यांच्या वतीने सर्वसामान्य जनतेची फसवणुक करतात. अशाचप्रकारे उपपोस्टे पेरमिली हद्दीत बांडिया नदीच्या पुलाचे बांधकाम चालु असलेल्या ठिकाणी जाऊन भारतीय कम्युनिस्ट पार्टी माओवादी दक्षिण गडचिरोली डिवीजन कमिटी या मथळयाचे लेटरहेड दाखवून ७० लाख रुपयेची मागणी केली व ती मागणी पुर्ण न केल्याने दिनांक ५/११/२०२२ रोजीचे रात्री ३.१५ वा. सदर फिर्यादीस दोन अनोळखी बंदुकधारी व्यक्तिंनी त्याचे कामाचे साईटवर झोपलेल्या ठिकाणावरुन त्यास बंदुकीचा धाक दाखवुन रात्री मौजा चंद्रा जंगल परीसरामार्गे मौजा रापल्ले जंगल परीसरामध्ये अपहरण करुन नेले. त्यास बंदुकीचा धाक दाखवुन पुलियाचे काम पुर्ण करायचे असेल तर ७० लाख रुपये तीन दिवसांत दया, नाहीतर तुमच्या कंपनीच्या साहीत्याची जाळपोळ करुन तुम्हाला जिवानिशी ठार करु अशी धमकी देवून खंडणी मागितली. सदर घटनास्थळी हिरव्या रंगाचे कपडे परिधान केलेले १० ते १२ इसम आजुबाजुला उभे होते. ते नक्षलवाद्यांसारखे दिसत होते. असे फिर्यादिच्या तोंडी रिपोर्ट वरुन उप पोलीस स्टेशन पेरमिली अप. क्र. १८/२०२२ कलम ३६४ (अ), ३८७, ३४२, ५०६, ३४ भादंवि. ३/२५ भारतिय हत्यार अधिनियम अन्वये गुन्हा नोद करण्यात आला. गोपनिय सुत्रांकडुन मिळालेल्या माहीतीनुसार तपास केला असता नक्षल समर्थकांनी नक्षलवाद्यांच्या वतीने नक्षली पेहराव करुन बनावट नक्षलवादी कॅम्प तयार करुन स्वतःजवळ असलेल्या भरमार बंदुकीचा धाक दाखवुन ही खंडणीची मागणी केली आहे. यामध्ये १) चैनु कोम्मा आत्राम वय ३९ वर्ष रा. आलदंडी २) दानु जोगा आत्राम वय २९ वर्ष रा. आलदंडी ३) शामराव लखमा वेलादी वय ४५ वर्ष रा. चंद्रा ४) संजय शंकर वेलादी वय ३९ वर्ष रा. चंद्रा ५) किशोर लालु सोयाम वय ३४ वर्ष रा. चंद्रा ६) बाजु केये आत्राम वय २८ वर्ष रा. येरमनार टोला ७) मनिराम बंडु आत्राम वय ४५ वर्ष रा. रापल्ले ८) जोगा कोरके मडावी वय ५० वर्ष रा. येरमनार टोला ९) लालसु जोगी तलांडे वय ३० वर्ष रा. येरमनार १०) बजरंग बंडु मडावी वय ४० वर्ष रा. मल्लमपल्ली ता. अहेरी जि. गडचिरोली असे आरोपी निष्पन्न झाल्याने त्यांना सदर गुन्हयात अटक करण्यात आली असुन, नमुद आरोपींकडुन सदर गुन्हयामध्ये समाविष्ट असलेले १) नक्षल पत्रक २) एसएलआर ची काळया रंगाची मॅग्झिन व एसएलआरचे ७.६२ एमएमचे १९ जिवंत काडतुसे ३) २ भरमार बंदुका ४) हिरो स्प्लेंडर प्रो कंपनीची मो. सा. क्र. एम एच ३३ / एल ८८४६ ५) हिरो एचएफ डिलक्स कंपनीची मो.सा. क्र. एमएच ३३ / एएन / ३३२५ ६) कमांडो हिरवा टी
शर्ट २ नग, डांगरी कलरची लोअर पँट १ नग ७) लाल रंगाची टॉर्च १ नग असा एकुण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा. मा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. अनुज तारे सा. मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. कुमार चिंता सा. मा. अपर पोलीस अधीक्षक श्री यतिश देशमुख सा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अमोल ठाकुर यांचे मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी धवल देशमुख, पोउपनि अजिंक्य जाधव, पोउपनि दिपक सोनुने, पोहवा. रामहरी जांभुळे पोहवा रविंद्र बोढे, पोशि. राहुल खार्डे, पोशि. महेश दुर्गे, पोशि प्रशांत मेश्राम, पोशि. मधुकर आत्राम, पोशि. विवेक सिडाम, पोशि. राकेश उरवेते, पोशि. ब्रिजेश सिडाम यांनी पार पाडली असून, सदर घटनेचा पुढील तपास गडचिरोली पोलीस दल करीत आहे.
मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल . यांनी आवाहन केले की, शासकीय काम , करणाऱ्या कंत्राटदारांनी अशा खंडणी मागणाऱ्यांपासुन सावध राहावे व पोलीस दलाची मदत घ्यावी. नक्षलवाद्यांच्या वतीने फसवणुक करणाऱ्या किंवा नक्षलवाद्यांना सहाय्य करणाऱ्यांची गय केली जाणार नाही तसेच नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांवर अंकुश लावण्यासाठी नक्षलविरोधी अभियान तीव्र करण्यात आल्याचे सांगुन, नक्षलवादयांनी नक्षलवादाची हिंसक वाट सोडुन आत्मसमर्पण करुन सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे.