*संविधान दिन
बाबासाहेबांचा पुण्याईने
मिळाले देशाला संविधान
जन कल्याण साधण्या
दिली लोकशाही महान …..॥१॥
हुकूमशाहीला नाही थारा
सत्ता नागरीकांच्या हाती
स्वातंत्र्य, समता, बंधुत्वाने
एकत्र नांदे धर्म अन् जाती…..॥२॥
घटनेने मिळाले जनतेला
हक्क, कर्तव्य, अधिकार
संसद शासन प्रणालीने
करी भारताचा कारभार…..॥३॥
कर्तव्याची जाण ठेवून
सर्वदा जपूया देशहित
व्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क
बहुमोल साधते जनहीत….॥४॥
न्याय शासन प्रणाली
देई सर्वांना न्यायदान
भारत देशाला मिळाले
लोकशाही एक वरदान……॥५॥
एकतेची बांधून कमान
रक्षण करूया देशाचे
जागर संविधानाचा
जतन करू लोकशाहीचे…..॥६॥
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
प्रा. प्रकाश सरदार बिऱ्हाडे (रविराज)
रा. नांदरखेडा ता शहादा जि.नंदुरबार