गडचिरोली:- दिनांक २३/११ : स्थानिक विश्राम गृहात बाळासाहेबाची शिवसेना महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी यूवा सेना सदस्य, हर्षल शिंदे , शूभम नवले.हे गडचिरोली जिल्याच्या दौऱ्यावर आले. यावेळी त्यांनी यूवा सेना पदाधिकारी संवाद परिसंवादाच्या माध्यमातून जिल्हा कार्यकारिणी,यूवासेना, महीला आघाडी, यांच्याशी पक्ष वाढीसाठी संदर्भाने विशेष चर्चा केली,त्या सोबत आगामी स्थानिक स्वराज संस्था च्या निवडणुकीत बाळासाहेब च्या शिवसेना पक्षाचे ऊमेदवार निवडुन जातील याकडे पक्ष कार्यकर्त्यांनी कामाला लागावे व पक्षात कोण श्रेष्ठ, कोण वरीष्ठ, असा भेद न करता पदाधिकारी असो की कार्यकर्त्ता असो आपला पक्ष बळकटीकरणासाठी प्रत्येकानी प्रयत्न करावे असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला. या प्रसंगी बाळासाहेबांची शिवसेना सहसंपर्क प्रमुख हेमंत भाऊ जंबेवार.,जिल्हा प्रमुख राकेश भाऊ बेलसरे,जिल्हा महिला प्रमूख Amita madavi अमिता ताई मडावी,. जिल्हा यूवा सेना प्रमुख दिपक भारसागडे.. जिल्हा उपाध्यक्ष अविनाश वरगंटीवार.. जिल्हा उपाध्यक्ष बाळूभाऊ उंदीरवाडे,शहर अध्यक्ष निलेश बोमनवार,चामोर्शी ता.प्रमुख पप्पी पठाण,गौरव बाला मूलचेरा प्रमुख,सोशल मीडिया प्रमुख सत्यपाल कूत्तरमारे.,शहर महीला सचिव वर्षा पेंदाम सहसचिव गिताताई बोबाटे.,यूवती सेना काजल शेंडे.अमित देवतळे,अनूप गोंगले,आदि मान्यवर उपस्थित होते.