रस्ते अपघातात बळी पडलेल्यांसाठी जागतिक स्मृती दिन साजरा

87

रस्ते अपघातात बळी पडलेल्यांसाठी जागतिक स्मृती दिन साजरा

 

गडचिरोली,(Gadchiroli) दि.21 : उप प्रादेशिक परिवहन कार्यालय,गडचिरोली यांचे वतीने दिनांक 20 नोव्हेंबर 2022 रोजी रस्ते अपघातात बळी पडलेल्यांसाठी जागतिक स्मृती दिन साजरा करण्यात आलेला होता.त्यानिमीत्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते.

दिनांक 20 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 8.00 वाजता रस्ता सुरक्षाविषयक मार्गदर्शनपर कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी कार्यालयातील सहा. मोटार वाहन निरीक्षक पी.डी.येवले यांनी जनतेला रस्ता सुरक्षेविषयक माहिती दिली.सकाळी 10.00 वाजता उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, गडचिरोली येथे रस्ता सुरक्षेविषयक शपथ घेण्यात आली. सदर कार्यक्रमास कार्यालयातील अधिकारी,कर्मचारी तसेच इतर शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सकाळी 11.30 वाजता एस.टी.आगार येथे रस्ता सुरक्षा मार्गदर्शनपर कार्यक्रम तसेच रस्ता सुरक्षा विषयक शपथ घेण्यात आली.

यावेळी एस.टी. आगारातील कर्मचारी व अधिकारी तसेच उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने सहा. मोटार वाहन निरीक्षक उपस्थित होते. दुपारी 12.00 वाजता टॅक्सी चालक संघटनेकरीता रस्ता सुरक्षा मार्गदर्शन करण्यात येऊन सर्व वाहन चालकांना रस्ता सुरक्षेची शपथ देण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here