झाडे झाडिया समाजाच्या समस्या विधानसभेत मांडणार आमदार डॉक्टर देवरावजी होळी
मक्केपल्ली येथे झाडे झाडीया समाजाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांची उपस्थिती
Gadchiroli – गडचिरोली :-झाडे झाडिया समूहातील समाजाच्या समस्या व प्रश्न सोडविल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नसून येत्या हिवाळी अधिवेशनात आपल्या समाजाचा प्रश्न विधानसभेत लावून धरणार असे आश्वासन आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी मक्केपल्ली येथे झाडे या समाजाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले.Makkepali-chamorahi -gadchiroli :-मौजा मक्केपल्ली ता. चामोर्शी येथे झाडे झाडिया समाजाच्या बैठकीत उपस्थित मा. आ. डॉ. देवराव होळी यावेळी बैठकीला श्री. अनिल मंटकवार अध्यक्ष, श्री. तुंकलावर सचिव, श्री. पुरलवार सर श्री. जनार्धन तुंकलवार, श्री. चौधरी श्री. कमलेवार सर श्री. गुजेलवार सर श्री. रमेश बेंडकवार श्री. कामेलवार माजी प. स. सदस्य, श्री. रुपचंद गांधरवार श्री. चंद्रशेखर तुंकलवार सरपंच आदित्य कांदो श्री. दिलीप चलाख तालुका अध्यक्ष, श्री. सुरेश शहा बंगाली आघाडी, श्री. भास्कर बुरे जिल्हा महामंत्री ओबीसी मोर्चा, यांचेसह समाजाचे प्रमूख पदाधिकारी उपस्थित होते.
चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात झाडे ,झाडीया, झाडे कुणबी, झाडे कापू ,झाडे कापेवार ही झाडे या एका समूहाची जमात मागील अनेक वर्षांपासून वास्तव्यास आहे. या समाजाला पूर्वी एन.टी.सी चे प्रमाणपत्र देण्यात येत होते. परंतु विद्यमान परिस्थितीमध्ये सदर प्रमाणपत्र देण्यास शासन टाळाटाळ करीत आहे. यामुळे या समाजातील विद्यार्थी व नौकरवर्ग यांचे भवितव्य अंधारात जात असल्याने ते चिंतेत सापडले आहे . त्यामुळे शासन स्तरावर आमच्या मागणीचा पाठपुरावा करावा अशी विनंती या समाजाने आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्याकडे या बैठकी दरम्यान केली.
यावेळी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी आपल्या मागण्यांचा पाठपुरावा करू आपल्या समस्या विधानसभेत मांडू व आपल्याला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन त्यांनी यावेळी या झाडे झाडीया समाजातील या नेतृत्वाला दिले.