शेतकऱ्यांना मिळाला बाजार समिती निवडणूक लढविण्याचा अधिकार

73

शेतकऱ्यांना मिळाला बाजार समिती निवडणूक लढविण्याचा अधिकार

शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथे खरेदी विक्री संघावर काढण्यात आलेल्या मोर्चाचे व शहर बंदचे फलित

खासदार अशोक भाऊ नेते यांच्या कडून शिंदे – फडणवीस सरकारचे जाहीर आभार

मतदानासोबतच निवडणूक लढविण्याचाही मिळाला शेतकऱ्यांना प्रथमच अधिकार

Gadchiroli :- सर्वसामान्य गोरगरीब शेतकऱ्यालाही बाजार समितीची निवडणूक लढवण्यासाठी परवानगी देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक भाऊ नेते यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जाहीर आभार मानले आहे. शेतकऱ्याला बाजार समिती निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार देण्याबरोबरच आता निवडणूक लढविण्याचा सुद्धा अधिकार देऊन शिंदे – फडणवीस सरकारने बळीराजाला बंधन मुक्त करून खूप मोठा न्याय दिला आहे , असेही खासदार अशोक भाऊ नेते यांनी सांगितले* *शेतकऱ्यांना बाजार समिती निवडणूक लढविण्यास परवानगी देण्यासाठी कृषि पणन धोरण अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णय गुरुवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रामुख्याने घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांना निवडणूक लढवण्यास परवानगी दिल्यामुळे कृषि उत्पन्न बाजार समितीच्या कामकाजात सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प्रतिनिधीत्व आणि प्रत्यक्ष सहभाग वाढणार आहे.

देवेंद्र फडणवीस सरकार सत्तेत असताना शेतकऱ्यांना बाजार समिती निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार देण्यात आला. शिंदे – फडणवीस सरकारने सत्तेवर आल्या बरोबर शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार पुन्हा बहाल केला. आता त्यापुढे एक मोठे पाऊल टाकत शिंदे – फडणवीस सरकारने शेतकऱ्यांना बाजार समिती निवडणूक लढविण्यासाठी अधिनियमात दुरुस्ती केली आहे. ज्या सात बारा असलेल्या शेतकऱ्याने पिकवलेल्या शेतमालाच्या विक्रीसाठी बाजार समिती स्थापन करण्यात आली बाजार समितीत शेतकऱ्याला थेट निवडणुकीत सहभाग घेण्याचा अधिकार देऊन शिंदे- फडणवीस सरकारने शेतकऱ्यांना सावकारांच्या तावडीतून बंधनमुक्त केले आहे ,व नुकताच खासदार अशोक भाऊ नेते यांचे मार्गदर्शनात गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथे नगर पंचायत येथील नगरसेवक आशीष भाऊ पिपरे ,रमेश अधिकारी यांनी दिनांक अकरा नोहेंबरला चामोर्शी येथील खरेदी विक्री संघावर मोर्चा काडून व संपूर्ण शहर बंद ठेऊन शेतकरी बांधवांचे अनेक महत्त्वाचे प्रलंबित प्रश्न बाबत मागणी केली होती सदर मागणीची दखल खासदार अशोक भाऊ नेते यांनी घेतली होती व प्रशासनाने सुद्धा प्राधान्याने सदर विषय राज्य सरकारला पाठवला होता यामध्ये प्रामुख्याने बाजार समितीत शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देण्याबाबत मागणीचाही प्रामुख्याने समावेश होता राज्य सरकारच्या या निर्णयाचे तालुक्यातील सर्व स्तरातून आभार व्यक्त करण्यात येत आहे या निर्णय बद्दल तालुक्ातील शेतकरी बांधवांचे वतीने येथील अशोक धोडरे ,माणिक तुरे यांनी सुद्धा राज्य सरकारचे आभार मानले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here