3 years imprisonment and 20,000/- Rs. Penalty was imposed by the Chief District and Sessions Judge of Gadchiro विनयभंग करणा-या आरोपीस 3 वर्ष कारावास व 20,000/- रू. दंडाची शिक्षा गडचिरोली येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश,श्री. उदय बा. शुक्ल यांचा न्यायनिर्णय

167

विनयभंग करणा-या आरोपीस 3 वर्ष कारावास व 20,000/- रू. दंडाची शिक्षा गडचिरोली येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश,श्री. उदय बा. शुक्ल यांचा न्यायनिर्णय

3 years imprisonment and 20,000/- Rs. Penalty was imposed by the Chief District and Sessions Judge of Gadchiroli, judgment of Shri. Uday B. Shukl

गडचिरोली :- gadchiroli आरोपी नामे गणेश मनोहर म्हशाखेत्री, वय 34 वर्ष, रा. कुरुड ता. चामोर्शी हा दिनांक 3/8/2020 रोजी सकाळी 11.00 वाजताचे सुमारास पिडीता (फिर्यादी) ही तिचे स्वतःचे घरी जेवन करीत असतांना आरोपी हा पिडीतेला पाणी मागीतल्याने पिडीता ही त्याला पाणी दिले. पाणी दिल्यानंतर आरोपीने जेवन मागीतले त्यावर पिडीतेने तुझ्या घरी जेवन नाही का असे म्हणाली त्यावेळी आरोपी हा आपल्या घरी निघुन गेला थोडयावेळातच आरोपी पिडीतेचा घरी परत आला व पिडीतेच्या अंगावर धावून पिडीतेला खाली पाडला व हाताचे, गळयाचे चुंबन घेवू लागला तेंव्हा पिडीता ही ओरडण्याचे प्रयत्न केले तेव्हां आरोपीने पिडीतेच्या तोंड दाबला व पिडीतेचा ब्लॉउज सरकावून चावा घेतला तेव्हा पिडीता ही आरोपीचे विरोध करुन जोराने ओरडल्याने गावातील आजू- बाजूचे बाया जमा झाले तेवडयात पिडीतेचा भाचा तिथे आला व दरवाजा उघडला असता आरोपी हा घरातच सापडला त्यावेळी पिडीतेचा भाचा यांनी आरोपीला दोन गालावर थापड मारले. तेव्हा आरोपी हा तेथून पळून गेला. सदर घटणेबाबत आरोपी विरोधात पोस्टे चामोर्शी येथे फिर्याद दिल्याने अप.क्र. 471/2020 कलम 376(1), 511,450, 354, 354 (अ), 354 (ब), 324 भादवी अन्वये गुन्हा नोदं करण्यात आला.पोलीस यंत्रणेने कौशल्यपूर्ण तपास करून आरोपी विरुध्द सबळ पुरावा मिळून आल्याने मा. न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले. फिर्यादी व ईतर साक्षीदारांचे बयाण तसेच सरकारी पक्षाचा युक्तीवाद मा. न्यायालयाने ग्राहय धरून आज दिनांक 04/01/2023 रोजी आरोपी गणेश मनोहर म्हशाखेत्री, वय 34 वर्ष, रा. कुरुड ता. चामोर्शी याला मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, श्री. उदय बा. शुक्ल गडचिरोली यांनी कलम 354 ( ब ) भादवी मध्ये 3 वर्ष कारावास व 10,000/- रूपये दंडाची शिक्षा तसेच कलम 324 भादवी मध्ये 1 वर्ष कारावास व 5,000/- रूपये दंडाची शिक्षा तसेच कलम 451 भादवी मध्ये 1 वर्ष कारावास व 5,000/- रूपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. वरील रखमेतून पिडीतेला नुकसान भरपाई म्हणून 15,000/- रुपये देण्याचे आदेश पारीत.सरकार पक्षातर्फे सहा. जिल्हा सरकारी वकील श्री. एस. यु. कुंभारे यांनी कामकाज पाहिले तसेच गुन्हाचा तपास मपोउपनि / निशा खोब्रागडे, पोस्टे चामोर्शी यांनी केला आहे. तसेच संबधीत प्रकरणात साक्षदारांशी समन्वय साधुन प्रकरणाची निर्गती करीता कोर्ट पैरवी अधिकारी व कर्मचारी यांनी खटल्याच्या कामकाजात योग्य भुमीका पार पाडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here