26 व्या राष्ट्रीय युवा मोहत्सवात सं.गा.बा.अ. विद्यापीठाच्या रा.से.यो. चमुचे सुयशलडॉ दिलीप मालखेडे कुलगुरू संगाबाअवि यांच्या मार्गदर्शनात रासेयो स्वयंसेवक विद्यार्थ्यांचा सहभाग.
नुकत्याच पार पडलेल्या युवा व क्रीडा मंत्रालय द्वारा आयोजित 26 व्या राष्ट्रीय युवा मोहत्सवात संत गाडगे बाबा अमरावती विद्याीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवक विद्यार्थ्यानी उत्कृष्ठ सहभाग नोंदवला. 26 वा राष्ट्रीय युवा मोहत्सव, हुबळी, जिल्हा धारवाड, कर्नाटक राज्य येथे आयोजित करण्यात आला. 2023 मध्ये महाराष्ट्र राज्य व गोवा राज्य येथून संयुक्तपणे विद्यार्थी चमू या या युवा मोहत्सवात सहभागी झाल्या. दिनांक 12 जानेवारी ते 16 जानेवारी 2023 या कालावधीत या 26 व्या राष्ट्रीय युवा मोहत्सवाचे आयोजन करण्यात आले. संपूर्ण देशभरातून विविध शासकीय विद्यापीठांच्या चमू या राष्ट्रीय युवा मोहत्स्वात सहभागी झाल्या होत्या. या राष्ट्रीय युवा मोहत्सवा मधून देशभरातील वैविध्यपूर्ण संस्कृतीची ओळख निर्माण केली जाते. देशाच्या कानाकोपऱ्यातून या स्पर्धेत ७००० चे वर विद्यार्थी कलावंत सहभागी झाले आहेत. राष्ट्रीय युवा मोहत्सावाचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शुभहस्ते तर प्रमुख उपस्थिती कर्नाटक राज्याचे राज्यपाल थावरचंद गहलोत, मुख्यमंत्री बसवराज बोमाई व इतर केंद्रीय व राज्य मंत्री यांचे उपस्थितीत पार पडला.
या कार्यक्रमात आयोजित विविध स्पर्धांमध्ये महाराष्ट्र व गोवा राज्याच्या संयुक्त संघाने पारितोषिके पटकावली. यामध्ये संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावतीच्या राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी उत्स्फर्तपणे सहभाग नोंदवला.
विविध स्पर्धा आणि उपक्रमामध्ये विद्यार्थीनी कु. श्रेया शेळके सिपणा कॉलेज ऑफ इंजिनिरिंग अमरावती,हिने प्रश्नमंजुषा स्पर्धेत पारितोषिक पटकावले तर अमर कतोरे याने शास्त्रीय गायन तसेच देशभक्तीपर गीत गायन, व इतर उपक्रमा मध्ये सपना बाबर, अभिजित काळे, आदित्य इंगोले, साक्षी चोपडे, सुहानी अजमिरे, मनश्री मुरदकर यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विद्यापीठाचे प्रतिनिधीत्व केले.
या युवा मोहत्सवात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती द्वारे महाराष्ट्र राज्य व गोवा राज्य विद्यापीठ संयुक्त चामूचे व्यवस्थापक म्हणून जबाबदारी प्रा पूजा पानसे यांनी सांभाळली.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ रासेयो स्वयंसेवक विद्यार्थ्यानी विद्यापीठाचे रा.से.यो. संचालक प्रा. डॉ. राजेश बुरंगे यांच्या मार्गदर्शनात आपला सहभाग नोंदवला. राष्ट्रीय युवा मोहत्सवाचे देशपातळीवर आयोजन केले जाते यामध्ये विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यास प्रा. डॉ. राजेश बूरंगे यांनी अथक परिश्रम घेतले.
या राष्ट्रीय युवा महत्सवात यशस्वी सहभाग व यशाबद्दल तसेच संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे नाव राष्ट्रीय स्तरावर उंचावल्या बद्दल डॉ. दिलीप मालखेडे कुलगुरू, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ,डॉ विजयकुमार चौबे प्रभारी कुलगुरू संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ,डॉ मुरलीधर चांदेकर माजी कुलगुरू,डॉ तुषार देशमुख कुलसचिव संगाबाअवि, डॉ राजेश बूरंगे संचालक रा से यो संगाबाअवि, डॉ. कार्तिकेयन, महाराष्ट्र व गोवा राज्य केंद्र संचालक यांनी महाराष्ट्र राज्य चमू व्यवस्थापक कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. पूजा पानसे व सहभागी विद्यार्थी संघाचे अभिनंदन केले.