रोजगार हमी योजनेतून २५ लक्ष ५२ हजार मनुष्यदिन रोजगार निर्मिती-जिल्हाधिकारी संजय दैने
मजुरांच्या स्थलांतरावर नियंत्रण
१०९ अमृत सरोवर पुनरूज्जीवीत
गडचिरोली दि. २४ : जिल्ह्यात चालु आर्थिक वर्षात रोजगार हमी योजनेअंतर्गत आतापर्यंत २५ लक्ष ५२ हजार मनुष्यदिवस रोजगार निर्मिती झाली आहे. वित्तीय वर्ष 2024 – 2025 साठी 1 लक्ष 32 हजार नोंदणीकृत मजुरांकरिता 28 लक्ष14 हजार मनुष्यदिवस रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट देण्यात आलेले होते. त्यातुलनेत ९०.६९ टक्के उद्दिष्ट गाठण्यात आले आहे. त्यामुळे मजुरांच्या स्थलांतरावरही नियंत्रण आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी संजय दैने यांनी दिली आहे.
रोजगार हमी योजनेतून 70 कोटी 92 लक्ष 51 हजार रुपये मजुरीचे वाटप बँक व पोष्टखात्यातून करण्यात आले आहे.एकूण रोजगार निर्मितीतून 8.96 टक्के अनुसुचित जमाती आणी 37.01टक्के अनुसुचित जाती प्रवर्गाकरीता मनुष्यदिन निर्मीती झालेली आहे तर महीलांकरीता 48.60 टक्के मनुष्यदिन निर्मीती झालेली आहे. एकूण झालेल्या कामांपैकी 30.62 टक्के इतका खर्च कृषि व कृषि आधारीत कामावर करण्यात आलेला आहे. या वर्षीच्या अतिवृष्टीचे स्वरुप पाहता आगामी कालावधीत महाराष्ट्र गा्रमीण रोजगार हमी योजनेवर मजुरांचे येण्याचे प्रमाण जास्त असल्याचे गृहित धरुन त्यानुसार वार्षीक नियोजन करण्यात आलेले आहे. अकुशल हातांना कामे देण्याबरोबरच कायम स्वरुपी मत्ता निर्मीतीचे देखील लक्ष ठेवण्यात आलेले आहे.
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमीत्त 75 अमृत सरोवर निर्मीतीचे उद्दिष्ट जिल्ह्यास दिलेले होते. गडचिरोली जिल्ह्याने 109 अमृत सरोवर पुनरुज्जिवनाचे काम पुर्ण केलेले आहे. जिल्ह्याने पुर्ण झालेल्या अमृत सरोवर स्थळी 1 मे, 2024 व 15 ऑगष्ट, 2024 रोजी विविध कार्यक्रम राबविण्यासह ध्वजारोहण करण्यात आले. 21 जुन आंतरराष्ट्रीय योग दिवस सुध्दा अमृत सरोवरांवर मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. जिल्ह्यातील प्रत्येक अमृत सरोवर टिकाऊ व दिर्घकालीन संपत्ती निर्मीतीचे मानाचे प्रतिक मानल्या जाईल. प्रत्येक अमृत सरोवर हे परीपक्व व अनंतकाळ टिकणारे असल्यामुळे भविष्यात पाणी सिंचन, मत्स्यपालन, जलपर्यटन आणि इतर कामांसाठी वापरुन उदर निर्वाहाचे साधन असेल त्या परीसरातील सामाजिक सम्मेलन बिंदू म्हणुनही आदर्शाचे ठिकाण असेल.
जिल्ह्यात “मेरी मिट्टी मेरा देश” उपक्रमाअंतर्गत जास्तीत जास्त देशी झाडांची लागवड करण्यासह शिलाफलक तयार करुन पंचप्रण शपथ घेण्यात आली. “एक पेड माँ के नाम” अभियान सुध्दा जिल्ह्यात जनसहभागातून यशस्वीरित्या राबविण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी दैने यांनी कळविले आहे.