लांझेंडा येथेआमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे हस्ते पारोलिंगो कायोपुनेम देवस्थानाची महापूजा
क्रांतिवीर बिरसा मुंडा आदिवासी बहुउद्देशीय संस्था लांझेंडा गडचिरोलीच्या वतीने आदिवासी समाज प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन
गडचिरोली:- क्रांतिवीर बिरसा मुंडा आदिवासी बहुउद्देशीय संस्था लांजेडा गडचिरोलीच्या वतीने पारोलिंगो कोयापूनेम देवस्थानांची महापूजा व आदिवासी समाज प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाला आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी उद्घाटक म्हणून उपस्थित राहून पारोलिंगो कायोपुनेम देवस्थानाची महापूजा केली.याप्रसंगी गडचिरोली नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, तालुक्याचे महामंत्री हेमंत बोरकुटे , आयोजक व संस्थेचे अध्यक्ष विक्रमजी गेडाम ,जनार्धनजी मडावी, विश्वेश्वर मेश्राम, शशिकलाबाई मडावी ,दिपाली जुमनाके, राजू मेटे, यांचे सह संस्थेचे पदाधिकारी कार्यकर्ते व आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते