19 फर्नीचर मार्टवरती सिरोंचा वनविभागातील वनकर्मचाऱ्यांचे एकाच वेळी छापे, एकुण 7,85,905/- किंमतीचा अवैध साग माल जप्त

221

19 फर्नीचर मार्टवरती सिरोंचा वनविभागातील वनकर्मचाऱ्यांचे एकाच वेळी छापे, एकुण 7,85,905/- किंमतीचा अवैध साग माल जप्त

Simultaneous raids by forest officials of Sironcha Forest Department on 19 furniture marts, seizure of illegal teak goods worth a total of 7,85,905/-

Gadchiroli गडचिरोली, दि.24 : दिनांक- 22.06.2023 रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आसरअल्ली परिक्षेत्रातील आसरअल्ली, जंगलपल्ली, अंकिसा, कंबलपेठा या गावात असलेल्या संपुर्ण 19 फर्नीचर मार्टवरती सिरोंचा वनविभागातील वनकर्मचाऱ्यांची पथके तयार करुन एकाच वेळी छापे टाकण्यात आलेली होती, त्यापैकी खाली नमुद फर्नीचर मार्टमध्ये मोठया प्रमाणात अवैध रित्या सागसिलपाट / सागकटसाईज फर्नीचर मार्ट धारकांकडे आढळून आला. त्यामध्ये 1) जय श्रीराम फर्निचर मार्ट, आसरअल्ली ( श्री. रविंद्र मिनाबाबू कासोजी ) 2) महालक्ष्मी फर्नीचर मार्ट, आसरअल्ली ( श्री. संतोष

साबंय्या गोत्तुरी) 3) लक्ष्मी फर्नीचर मार्ट, आसरअल्ली (श्री. समय्या पोचालू गंप्पा) 4) त्रिमुर्ती फर्नीचर मार्ट, जंगलपल्ली

(श्री. देवेद्र लच्चन्ना गोत्तुरी) 5) बालाजी फर्नीचर मार्ट, आसरअल्ली ( श्री. किशोर शंकर कोरटला) 6) ओम श्री विराट

फर्नीचर मार्ट जंगलपल्ली (श्री. राजेंद्र अंकन्ना गोत्तुरी) 7) गंगापुत्रा फर्नीचर मार्ट, आसरअल्ली (श्री. राजकुमार समय्या पोटे)

8) भार्गवचारी फर्नीचर मार्ट, अंकिसा ( श्री. सुरेश चंद्रय्या अरिंदा) सर्व फर्निचर मार्ट मध्ये मिळून रक्कम रुपये- 7,51,594/तसेच लावारीस दिसुन आलेला माल किंमत 34311/- असे एकुण 7,85,905/- किंमतीचा माल जप्त करुन आसरअल्ली परिक्षेत्र कार्यालयात जमा करुन संबधित फर्नीचर मार्ट धारकांविरुध्द भारतीय वन अधिनियम 1927 अन्वये वनगुन्हा नोंद करण्यात आला. वरिल सर्व फर्नीचर मार्ट धारकांचे परवाना दिनांक 23.06.2023 रोजी पासुन कायमस्वरुपी रद्द करण्यात आले. तसेच सदर माल जप्त करित असतांना झालेल्या प्राथमिक चौकशी मध्ये क्षेत्रसहाय्यक आसरअल्ली यांचा प्रत्यक्ष/अप्रत्यक्षपणे सहभाग असल्याबाबत आढळून आल्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले आहे. चौकशी दरम्यान असे समोर येत आहे की, मिळालेला अवैध माल हा आसरअल्ली लगतच्या वनविकास महामंडळ (FDCM) च्या साग रोपवनातील तसेच प्रादेशिक जंगलातील आहे. या जागांची तपासणी सुरु आहे. अवैध साग तोड मधील गुन्हेगार सराईत असुन वनविभागातील कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देणे, स्थानिक गावातील लोक माहिती देण्यास असहकार्य करणे या सारख्या बाबींमुळे वनविभागास अडचणी येत आहे. तरीही सदर गुन्हेगारांवर कडक कारवाई करुन त्यांच्यावर

आळा बसविण्याचा पुरेपुर प्रयत्न सिरोंचा वनविभाग करीत आहे. नजीकच्या काळातील ही मोठी कारवाई असुन यामुळे अवैध सागतोडीवर रोकथांब लागेल अशी खात्री आहे. फर्नीचर मार्ट यांना अवैध साग लाकूड पुरवठा करणारे गुन्हेगार हे अंकिसा, आसरअल्ली, कोपेला या गावातील लोक असुन त्यांची माहिती घेण्याची कारवाई जोमाने सुरु आहे. सदर कारवाई मध्ये श्री.पी.डी. बुधनवर, उपविभागीय वनअधिकारी सिरोंचा, श्री. पी. बी. झाडे, वनपरिक्षेत्र अधिकारी बामणी व त्यांची चमु, श्री.एस.पी.बारसागडे, वनपरिक्षेत्र अधिकारी झिंगानुर व त्यांची चमु, श्री. एन. टी. चौके, वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रनिघ), श्री.पी.एम.पाझारे, वपअ फिरते पथक तसेच देचली परिक्षेत्रातील वनकर्मचारी असे एकुण 50 अधिकारी / कर्मचारी मिळून कारवाई केली. वरिल प्रकरणाची सखोल चौकशी श्री. पी. डी. बुधनवर, उपविभागीय वनअधिकारी, सिरोंचा यांचे मार्गदर्शनात श्री. पी.बी. झाडे, वनपरिक्षेत्र अधिकारी, बामणी हे करित आहेत. वरिल कार्यवाहीच्या अनुषंगाने सिरोंचा वनविभागातील अवैध वृक्षतोड/ अवैधवाहतुक करण्यावर आळा बसेल अशी खात्री आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here