12 मार्चला भाजपचा महिला मेळावा व कर्तृत्ववान, होतकरू महिलांचा सत्कार कार्यक्रम

53

12 मार्चला भाजपचा महिला मेळावा व कर्तृत्ववान, होतकरू महिलांचा सत्कार कार्यक्रम

 

गडचिरोली :- दि 11 मार्च

भारतीय जनता पार्टी महिला आघाडी गडचिरोली शहराच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रामनगर, गडचिरोली येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चौकात महिला मेळावा व स्वकर्तुत्वाने व परिश्रम घेऊन कुटुंबाचे पालन पोषण व मुलांना उच्च शिक्षण देणाऱ्या कर्तबगार व होतकरू महिलांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन उद्या दिनांक 12 मार्च रोजी दुपारी 12 वाजता करण्यात आले आहे.

कार्यक्रमाला प्रामुख्याने गडचिरोली- चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते, भाजपचे जिल्हाध्यक्ष किसनजी नागदेवे, गडचिरोली विधानसभेचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी, आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णाजी गजबे, भाजपचे जिल्हा महामंत्री रवींद्र ओल्लालवार, जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे, जिल्हा महामंत्री प्रशांत वाघरे, जिल्हा महामंत्री गोविंदजी सारडा महिला आघाडी च्या जिल्हाध्यक्ष तथा माजी जिप अध्यक्षा योगीताताई भांडेकर, महिला आघाडीच्या जिल्हा प्रभारी तथा माजी नगराध्यक्ष योगिताताई पिपरे, माजी जिप सभापती रंजिता कोडाप, महिला आघाडी च्या जिल्हा महामंत्री वर्षाताई शेडमाके, भाजपचे शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे उपस्थित राहणार आहेत.

 

तरी या महिला मेळाव्याला शहरातील महिलांनी व भाजप महिला आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन भारतीय जनता पार्टी गडचिरोली शहराच्या वतीने महिला आघाडीचे शहराध्यक्ष कविता उरकुडे, शहर महामंत्री वैष्णवी नैताम, शहर महामंत्री रश्मी बाणमारे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here