२२ ऑगस्ट रोजी गडचिरोली येथे कुणबी मेळाव्याचे आयोजन समाज बांधवांनी मेळाव्याला उपस्थित राहावे कुणबी समाज व आमदार डॉक्टर देवराव होळी मित्र परिवाराचे आवाहन

44

२२ ऑगस्ट रोजी गडचिरोली येथे कुणबी मेळाव्याचे आयोजन समाज बांधवांनी मेळाव्याला उपस्थित राहावे कुणबी समाज व आमदार डॉक्टर देवराव होळी मित्र परिवाराचे आवाहन

विश्रामगृहात कुणबी समाज बांधवांची बैठक

S bharat news network

समाजातील गुणवंत विद्यार्थी व नवनियुक्त पोलिस व अधिकारी नियुक्त झालेल्यांचा सत्कार

 

दिनांक १७ ऑगस्ट गडचिरोली. :- कुणबी समाज बांधव व आमदार डॉक्टर देवराव होळी मित्र परिवाराच्या वतीने २२ ऑगस्ट २०२४ रोजी सेलिब्रेशन (फंक्शन) हॉल चामोर्शी रोड गडचिरोली येथे दुपारी २ वाजता कुणबी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या मेळाव्याला कुणबी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कुणबी समाज बांधव व आमदार डॉक्टर देवराव होळी मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

कुणबी समाज बांधवांच्या वतीने गडचिरोली येथील विश्रामगृहात या मेळाव्याच्या नियोजना संदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीला आमदार डॉक्टर देवरावजी होळी, जगदीश पाटील मस्के, रामरतन गोहणे, कविताताई उरकुडे , घनश्यामजी म्हस्के, अर्चना बोरकुटे, अनुरथ निलेकार, वासुदेवजी बट्टे, राजू खंगार, हेमंत बोरकुटे ,प्रशांत कोटगले, मनोज उरकुडे, सुधाकर बाबनवाडे, हेमंत बानबले ,रुपेश चुधरी, सुषमाताई डोईजड, दिलीप मस्के, यांचेसह समाज बांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here