२१ ऑगष्ट ला एससी-एसटी आरक्षण बचाव संघर्ष कृती समिती चे गडचिरोली जिल्हा बंद चे आवाहन
S bharat news network
गडचिरोली (दि,२० ऑगष्ट) आरक्षण बचाव संघर्ष कृती समिती गडचिरोली च्या वतीने दि. २१ ऑगष्ट २०२४ राज बुधवारला गडचिरोली जिल्हा बंद चे आवाहन करण्यात आले असुन दि २१ ऑगस्टला गडचिरोली शहर कडकडीत बंद ठेवण्यात येणार असुन धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती गडचिरोली ऑल मीडिया असोसिएशन (गामा)च्या स्थानिक रेस्ट हाऊस येथे झालेल्या पत्रकार परिषदेत आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीच्या पदाधिकारी यांनी दिली आहे.
अनु.जाती जमाती आरक्षण उपवर्गीकरण व क्रिमिलेअर बाबतीत मा. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल तात्काळ रद्द करण्यासाठी केंद्र सरकारने संसदिय कायदा पारित करावा. आरक्षणाचे अबकड गट पाडण्यात येवू नये, कारण ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अथक परिश्रमाने विविध जातीतील लोकांना एकत्र आणून गुलामी नष्ट केली परंतु या निर्णयाने फूट पाडून पुन्हा गुलामित टाकण्याचा प्रयत्न होत आहे असेही पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. सदर होवू घातलेल्या गडचिरोली बंद मधे सर्व अनु. जाती जमातीच्या लोकांनी संघटना व विविध गटातटातील लोकांनी गडचिरोली बंद च्या कार्यक्रमात येण्याचे आवाहन या पत्रकार परिषदेतून करण्यात आले आहे.
पत्रकार परिषदेला प्रा. मुनिश्वर बोरकर, प्रा भाष्कर मेश्राम, एडवोकेट राम मेश्राम, कुणाल कोवे, मिलिंद बाबोंळे, मंदिप गोरडवार, नरेश महाडोरे, सुरेश कन्नमवार, तुळशीराम सहारे,उमेश उईके, विद्या कांबळे, रेखा कुंभारे, अरविंद वाळके मालती पुडो,वनिता पदा यांचेसह अनेक एससी-एसटी आरक्षण बचाव संघर्ष कृती समिती चे कार्यकर्ते पत्रकार परिषदेला हजर होते.