होमगार्ड उमेदवारांची कागदपत्र पडताळणी व शारिरीक चाचणी 28 ऑगस्टपासून

33

होमगार्ड उमेदवारांची कागदपत्र पडताळणी व शारिरीक चाचणी 28 ऑगस्टपासून

 

गडचिरोली,(s bharat news network)दि.26: जिल्हा होमगार्डतर्फे होमगार्ड सदस्य नोंदणीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणी व शारिरीक चाचणीसाठी 28 ऑगस्ट ते 03 सप्टेंबर 2024 पर्यंत सकाळी 04.30 ते 11.00 या कालावधीमध्ये पोलीस मुख्यालय, गडचिरोली येथे बोलाविण्यात आले आहे.

जिल्ह्यातील गडचिरोली, आरमोरी, देसाईगंज, चामोर्शी, अहेरी, सिरोंचा या पथकातील पुरुष व महिला उमेदवारांचा अनुशेष भरुन काढण्यासाठी नविन होमगार्ड सदस्य नोंदणी करिता https://maharashtracdhg.gov.in/mahahg/login1.php या संकेतस्थळावर 14 ऑगस्ट 2024 पावेतो अर्ज मागविण्यात आले होते.

कागदपत्र पडताळणी व शारीरिक चाचणी करीता येतांना ज्यांनी अर्ज जमा केला नाही त्यांनी सोबत आणावा. एन.सी.सी.बी. व सी. प्रमाणपत्र, आय.टी.आय. प्रमाणपत्र, जिल्हा स्तरीय क्रीडा प्राविण्य प्राप्त, जडवाहन चालक परवाना व इतर तपशिलाच्या सर्व संबंधित मुळ प्रमाणपत्र व दोन पासपोर्ट फोटो नोंदणीचे वेळी सादर करायचे आहेत.

 

उमेदवारांने शारिरीक क्षमता चाचणी मध्ये पात्र होणे करिता 40 टक्के गुण मिळविणे आवश्यक राहील (धावणे या प्रकारात किमान 10 गुण व गोळाफेक या प्रकारात किमान 4 गुण आवश्यक राहील). होमगर्ड नोंदणी प्रक्रिया पारदर्शक राहणार असुन उमेदवारांनी कोणत्याही अमिषाला बळी पडु नये तसेच शिफारस/वशिला इ. गैरमार्गाचा वापर करु नये. होमगार्ड नोंदणी करिता कोणी पैसे/लाचेची मागणी केल्यास तात्काळ अपर पोलीस अधिक्षक, गडचिरोली व अधिक्षक, लाच लुचपत प्रतिबंधक कार्यालय, गडचिरोली यांचेकडे तक्रार करावी. अतिवृष्टीमुळे वेळापत्रकात बदल झाल्यास त्याची सुचना https://maharashtracdhg.gov.in/mahahg/login1.php या संकेतस्थळावर वेळोवेळी देण्यात येईल. त्यामुळे उमेदवारांनी सदर संकेतस्थळावरील सुचनांचे अवलोकन करावे, असे जिल्हा समादेशक होमगार्ड तथा अपर पोलीस अधिक्षक एम. रमेश यांनी कळविले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here