स्वातंत्र्य दिनाचा मुख्य शासकीय समारंभ सकाळी 9.05 वाजता
जिल्हाधिकारी संजय दैने यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण
गडचिरोली,(S bharat news network)दि.13: गुरूवार दिनांक 15 ऑगस्ट 2024 रोजी भारतीय स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्य ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे सकाळी 9.05 वाजता आयोजित करण्यात आला आहे. याप्रसंगी जिल्हाधिकारी संजय दैने यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे.
जिल्हा परिषदेत सकाळी 8.05 वाजता ध्वजारोहण
जिल्हा परिषद येथे सकाळी 8.05 वाजता प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आयुषी सिंह यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे.
0000