सि.टि.-वन नरभक्षक वाघ अखेर जेरबंदमा .खा.अशोकजी नेते यांनी केलेल्या सततच्या मागणीला व प्रयत्नाला अखेर यश.
मा.ना.श्री.सुधिरभाऊ मुनगंटीवार,सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय म.रा.यांच्याकडे केलेल्या सततच्या पाठपुराव्याला अखेर यश याप्रसंगी आभार……
दिं.१३ ऑक्टोंबर २०२२
गडचिरोली:-मान.खासदार अशोकजी नेते यांनी सततच्या केलेल्या मागणीला व प्रयत्नाला अखेर यश जिल्ह्यात धुमाकूळ घालुन अनेकांचा बळी घेणारा सी.टि.वन हा नरभक्षक वाघ अखेर जेरबंद झाल्याने केलेल्या सततच्या मागणीला व प्रयत्नाला अखेर यश आले.
मा.ना.श्री.सुधिरभाऊ मुनगंटीवार यांच्याकडे केलेल्या सततच्या पाठपुराव्याला अखेर यश आल्याने जिल्ह्यात अनेकांचा बळी घेणारा सी.टि.वन हा नरभक्षक वाघ अखेर जेरबंद झाला. त्यामुळे याप्रसंगी मंत्री महोदय मा.सुधिरभाऊ मुनगंटीवार यांचे व वनविभागातील अधिकाऱ्याचे सुद्धा मी मनापासून, हृदयातून,अंतकरणातून,आभार व्यक्त करतो
गडचिरोली,अमिर्झा,आरमोरी,पोरला, वडसा,कुरखेडा,ब्रम्हपुरी या वनपरिक्षेत्राअंतर्गत शेतशिवारात शेतीच्या कामासाठी, कुणी गुरेढोरे राखण्यासाठी गेलेले गुराखी, मोटारसायकल ने रस्त्याने जात असणारे वाटेकरी अशा अनेक व्यक्तींवर दबाधरुन बसलेल्या पटेदार वाघाने अचानक हल्ला करून अनेक व्यक्तींचा बळी घेतलेला आहे. या परिसरात वाघाने खूप धुमाकूळ घालुन शेतकरी, शेतमजूर, नागरिक यांच्यात वाघाची खूप दहशत निर्माण झाली होती.त्यामुळे गडचिरोली चिमुर लोकसभा क्षेत्राचा खासदार म्हणून नरभक्षक वाघ सि.टी -वन हा जेरबंद झाल्याचे समाधान व्यक्त केलेल्या जात आहे.
तसेच सी.टि.वन या नरभक्षक वाघाला जेरबंद करण्यासाठी ताडोबा,नवेगांव बांध,नागझिरा या टीमने सुद्धा याप्रसंगी खूप मौलाची कामगिरी केल्याने कौतुक केले जात आहे.