साप्ताहिक आदिवासी जनता चे उद्घाटन व महाराष्ट्र टुडे न्यूज चॅनलचा वर्धापन दिन संपन्न
वर्तमान परिस्थितीत वर्तमान पत्र चालवणे जिकीरीचे काम
कार्यक्रमातील मान्यवरांचा सुर
गडचिरोली दि. ११ ऑगस्ट
वर्तमान डिजीटल माध्यमं, इलेक्ट्रॉनिक्स मिडिया आणि समाजमाध्यमांच्या विस्फोटात दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक किंवा नियतकालिक यासारखे मुद्रीत माध्यमे नव्याने सुरू करणे हे अत्यंत जिकिरीचे आणि कठीण काम आहे. असा सुर साप्ताहिक आदिवासी जनता या साप्ताहिकाचे उद्घाटन आणि महाराष्ट्र टुडे न्यूज चॅनलच्या वर्धापनदिना निमित्त आयोजित कार्यक्रमातील वक्त्यांकडून उमटला.
९ ऑगस्ट या विश्व आदिवासी दिन आणि क्रांती दिनाच्या पर्वावर पत्रकार जगदिश कन्नाके यांचे आदिवासी जनता या नव्याने प्रकाशित झालेल्या साप्ताहिकाचे उद्घाटन आणि महाराष्ट्र टुडे न्यूज चॅनलचा वर्धापन दिन सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी गडचिरोली येथील ज्येष्ठ पत्रकार कांतीभाई सुचक हे होते. तर मंचावरील अतिथींमध्ये पत्रकार रोहिदास राउत, हेमंत डोर्लीकर, जिल्हा माहिती कार्यालयाचे अधिकारी महादेव बसेना, प्रभाकर कोटरंगे, रेखा वंजारी, माहेश्वरी, संपादक जगदीश कन्नाके आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार श्रीमंत सुरपाम यांनी तर आभारप्रदर्शन पत्रकार जयंत निमगडे यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.