गोंडवाना विद्यापीठातील एक दिवसीय चर्चासत्रात स्त्रियांची प्रगती संविधानामुळे शक्य असल्याचा सूर वक्तत्यांच्या मनोगतातून उमटला.
संविधान स्त्रीहक्क आणि वर्तमान ‘ या विषयावर विचार मंथन
गडचिरोली,Gondwana university )दि:२
गोंडवाना विद्यापीठात दिनांक 30 नोव्हेंबरला ‘संविधान स्त्री हक्क आणि वर्तमान’ या विषयावर एक दिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. चर्चा सत्राच्या पहिल्या सत्रात मचांवर गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन , इतिहास विभागाच्या विभाग प्रमुख प्रा. डॉ. रश्मी बंड,कवियत्री कुसुमताई आलाम, सुप्रसिद्ध लेखिका स्तंभ लेखिका तसा सामाजिक कार्यकर्ता माधुरी साकुळकर, संविधानाचे अभ्यासक प्रा . देविदास घोडेस्वार आदी उपस्थित होते.भारतीय स्त्री आंबेडकरांच्या ऋणी आहेत. घटनेने आपल्याला अनेक अधिकार दिले आहेत .ज्या महिला अडचणीत असतात तेव्हा इतर महिलांनी त्यांना आवर्जून मदत केली पाहिजे . ‘संविधान आणि स्त्रीविषयक कायदे’ या विषयावर बोलताना सुप्रसिद्ध लेखिका स्तंभ लेखिका आणि सामाजिक कार्यकर्ता माधुरी साकुळकर यांनी व्यक्त केले.
संविधानाचे अभ्यासक प्रा. देविदास घोडेस्वार ‘संविधान आणि वर्तमान’ या विषयावर बोलताना म्हणाले, संविधानाची उद्देशिका हा भारताचा आत्मा आहे.राज्यघटना बनविताना भारतीय नागरिकांची मानसिकता व गरजांचा बारकाईने विचार केलाय. असे मनोगत त्यांनी व्यक्त केले.
इतिहास विभागाच्या विभाग प्रमुख डॉ. रशमी बंड यांनी देखील आपले विचार व्यक्त केले. या पहिल्या सत्राचे संचालन प्रा. डॉ.रूपाली अलोणे, तर आभार प्रा. प्रियंका बगमारे यांनी मानले.
चर्चासत्राच्या दुसऱ्या सत्रात अध्यक्षस्थानी गोंडवाना विद्यापीठाचे प्र -कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे होते. या सत्रात संविधानातील ‘बाल हक्क आणि वास्तव ‘या विषयावर बोलतांना ऍडव्होकेट स्मिता ताकसांडे यांनी बालगुन्हेगारी, बालकांचे लैंगिक शोषण, सायबर क्राईमच्या विळख्यात बालपण, बालगुन्हेगारीसाठी कारणीभूत घटक, बालकामगार आणि बालगुन्हेगारीवरची उपाययोजना यावर प्रकाश टाकला.
भारतीय संविधानाचे वेगळेपण या संदर्भात बोलताना संविधानाचे अभ्यासक विवेक सरपटवार म्हणाले,भारतीय संविधान हे जगातील सर्वांत मोठे लिखित स्वरुपातले संविधान आहे. ‘एकल नागरिकत्व’ ही आणखीन एक भारतीय राज्यघटनेची विशेषता आहे.
या सत्राचे संचालन प्रा.गुलाफशा मलाधारी यांनी केले.
या दरम्यान खुली चर्चा घेण्यात आली .यात उपस्थित शहरातील गणमान्य नागरिकांनी सहभाग घेतला होता . विविध प्रकारच्या प्रश्नांचं निराकरण या खुल्या चर्चेत करण्यात आलं.
कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्या अध्यक्षतेखाली या चर्चासत्राचा समारोप करण्यात आला. यावेळी मंचावर कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन, प्रमुख वक्त्या म्हणून प्राचार्य सन्मित्र सैनिकी विद्यालय, अरुंधती कावडकर होत्या आणि प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष नगरपरिषद गडचिरोली योगिताताई पिपरे होत्या
‘संविधानाची शक्ती, महिलांची प्रगती आणि राष्ट्रउभारणी’ या विषयावर बोलतांना प्राचार्य,सन्मित्र सैनिकी,विद्यालय बल्लारपूर अरुंधती कावडकर म्हणाल्या, विविध क्षेत्रात स्त्रियांनी प्रगती केली ती संविधानामुळे शक्य झाली आहे. समाजाला घेऊन चालणे आणि राष्ट्र उभारणीस मदत करण्याचा निर्धार सगळ्यांनी करायला हवाय.
अध्यक्ष स्थानावरून बोलताना गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे म्हणाले, जगातील अनेक संविधानापैकी आपलं संविधान हे अद्वितीय आणि लिखित स्वरूपातील आहे.
जीवन जगण्याचा प्रशस्त मार्ग संविधान आहे.
या सत्राचे संचालन प्रा. शुभम बुटले यांनी तर आभार प्रा. डॉ. सविता गोविंदवार यांनी मानले.
या चर्चासत्राच्या यशस्वीतेसाठी प्रा. डॉ. प्रीती काळे आणि प्रा.डॉ. नंदकिशोर मने यांनी परिश्रम घेतले.