शेतकऱ्यांचे धान खरेदी करतांना सहानुभूती बाळगा MLA Dr.devrao holi आमदार डॉक्टर देवरावजी होळी
आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने गिलगाव (ज) तालुका चामोर्शी येथील धान खरेदी केंद्राचे उद्घाटन.
आदिवासी विकास महामंडळाच्या अंतर्गत होणाऱ्या धान खरेदीचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा
गडचिरोली-Gadchiroli :-gilgav(jamindari) शेतकरी प्रचंड मेहनतीने धानाची पीक घेत असून ते पीक खरेदी केंद्रावर विक्रीसाठी आणल्यावर त्याच्याशी किमान सहानुभूतीने वागणूक ठेवावी असे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी चामोर्शी तालुक्यातील गिलगाव (ज) येथील आदिवासी विकास महामंडळ अंतर्गत असणाऱ्या धान खरेदी केंद्रांचे उद्घाटन करतांना केले.
यावेळी चामोर्शी पंचायत समितीचे माजी सभापती आनंदभाऊ भांडेकर, आदिवासी विकास महामंडळाचे कुंभारजी धान खरेदी केंद्राचे संस्थेचे अध्यक्ष वासुदेवजी कळामी, संचालक अमोलजी मारगोनवर, रामेश्वरजी मडावी, मुकरू मारापे, ओमप्रकाश बोमनावर ,हेमंत खेवले, टीकाराम मारापे विजय आरपालीवर राहुल घोंगडे विकास खोबे यांचे सह खरेदी मंडळाचे सदस्य पदाधिकारी ग्राम सचिव ग्राम पंचायतीचे सदस्य तसेच गावकरी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.धान खरेदी करतांना आदिवासी, गरीब, सर्वसामान्य शेतकऱ्याचे नुकसान होणार नाही याची काळजी आदिवासी विकास महामंडळाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घ्यावी असे निर्देश आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी या केंद्रांच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित मंडळाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले.