शिष्यवृत्तीकरीता महाडिबीटी पोर्टलवर अर्ज करावे सहाय्यक आयुक्त डॉं सचिन मडावी

54

शिष्यवृत्तीकरीता महाडिबीटी पोर्टलवर अर्ज करावे सहाय्यक आयुक्त डॉं सचिन मडावी

 

गडचिरोली,(s bharat news network)दि.08: समाज कल्याण विभाग व बहुजन कल्याण विभागाअंतर्गत राबविण्यात येणारी भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती /शिक्षण शुल्क व परिक्षा शुल्क व सर्व शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत अनुसुचित जाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग व विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गातील शैक्षणिक सत्र २०२४-२५ मध्ये प्रवेशित विद्यार्थ्याकडुन महाडिबीटी ऑनलाईन प्रणालीवर नवीन/ नुतनीकरण अर्ज नोंदणी व सादरीकरणाची प्रक्रिया तसेच सन २०२३-२४ या शैक्षणिक सत्रातील प्रलंबित अर्ज करण्याकरीता दिनांक २५ जुलै पासुन महाडिबीटी ऑनलाईन प्रणाली सुरु झालेली आहे. महाविद्यालयांने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन लवकरात लवकर अर्ज भरण्याची कार्यवाही करुन घ्यावी. महाडिबीटी प्रणालीवर मार्गदर्शक तत्वे व अर्ज सादर करण्याच्या प्रक्रियेचे नियमांबाबत सविस्तर माहितीसाठी सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच विद्यार्थी व पालक वर्ग यांनी https://mahadbtmahait.gov.in/Home/Index या संकेतस्थळाला भेट द्यावी.

सदर योजनेच्या अटी व शर्ती शासन निर्णयानुसार लागु राहील. दिनाक २५ जुलै २०२४ पासून महाडिबीटी ऑनलाईन प्रणालीवर अर्ज नोंदणी सुरु झाली असुन जिल्हयातील सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच विद्यार्थी व पालकवर्ग यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. सचिन मडावी यांनी केले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here