शिक्षणाला अध्यात्मिकतेची जोड दिल्यास मोठे यश, आमदार डॉक्टर देवराव होळी
गडचिरोली येथे श्री विद्या सरस्वती पूजन व विद्यारंभ संस्कार सोहळा उत्साहात
दिनांक ३१ ऑगस्ट गडचिरोली
S bharat news network
गडचिरोली विद्यार्थी ,युवक युवतिंनी आपल्या जीवनामध्ये ज्ञानार्जना सोबतच विद्येची देवता माता सरस्वती व आध्यात्मिकतेला आदर्श ठेवून विद्यार्जन केल्यास शिक्षणात तसेच जीवनात नक्कीच यश मिळेल असे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ देवरावजी होळी यांनी गडचिरोली येथे श्री विद्या सरस्वती पूजन व विद्यारंभ संस्कार सोहळ्याच्या प्रसंगी उपस्थित विद्यार्थी युवक युवती व पालकांना मार्गदर्शन करताना केले.*
*अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ श्री शेत्र त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक बालसंस्कार व युवा प्रबोधन विभागाच्या वतीने श्री विद्या सरस्वती पूजन व विद्यारंभ संस्कार सोहळ्याचे आयोजन गुरुपुत्र आदरणीय श्री नितीन दादा मोरे यांच्या उपस्थितीमध्ये कात्रटवार सभागृह गडचिरोली येथे आयोजीत करण्यात झाला. आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी या समारंभाला उपस्थित राहून सोहळ्यामध्ये सहभाग घेतला.
यावेळी ते म्हणाले की, आजची पिढी वाईट व चुकीच्या दिशेने जात असल्याचे आपणाला दिसून येत आहे. ही पिढी केवळ भौतिक वादाला महत्त्व देत आहे. त्यामूळे विद्यार्थी युवक तरुण तरुणी चुकीच्या मार्गाला जात आहेत. त्यामुळे त्यांना योग्य दिशा देण्यासाठी अध्यात्मिकतेचे महत्त्व समजावून सांगने आवश्यक आहे. त्यांना शिक्षणासोबतच अध्यात्मिकतेची जोड देण्याची नितांत आवश्यकता आहे. करिता आपल्या शैक्षणिक जीवनामध्ये आपण सर्वाँनी आध्यात्मिकतेला महत्व द्यावे असे आवाहन त्यांनी उपस्थित विद्यार्थी युवक युवती व पालकांना केले.