गडचिरोली :- Gadchiroli शिक्षण विभाग जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार कार्यक्रमाचे उद्घाटन कुमार आशीर्वाद मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या हस्ते पार पडला.यावेळी विद्यार्थ्याना मार्गदर्शन भाषणात आपले मत व्यक्त करताना म्हणाले विद्यार्थ्यीची जडण घडण हे शिक्षकच करीत असतो,विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासा मध्ये शिक्षकाचे अनन्य साधारण महत्त्व आहे,आज मी जे काही तुमच्या समोर ऊभा आहे ते माझ्या गुरुजनानमुळेच हे असे प्रतिपादन प्रतिपादन केले. जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान कार्यक्रम व जिल्हास्तरीय गुणवंत विद्यार्थी पुरस्कार वितरन सोहळा आयोजित केला गेला यावेळी उद्घाटक म्हणून कुमार आशीर्वाद मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली तर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी विनीत मत्ते, प्राचार्य जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था गडचिरोली, प्रमुख अतिथी मा राजकुमार निकम शिक्षणाधिकारी माध्यमिक मा विवेक नाकाडे शिक्षणाधिकारी प्राथमिक व सर्व गटशिक्षणाधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक 12 व माध्यमिक शिक्षक 2 याप्रमाणे एकूण 14 शिक्षकांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करुन सपत्नीक शाल शाल श्रीफळ चषक प्रमाणपत्र साडीचोळी द्वारे सत्कार करण्यात आले तर माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा 2022 मध्ये जिल्ह्यातून गुणानुक्रमे प्रथम आलेल्या 5 विद्यार्थ्यांना व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा 2022 कला, विज्ञान व वाणिज्य मध्ये जिल्ह्यातून गुणाानुक्रमे प्रथम आलेल्या प्रत्येकी 5 याप्रमाणे एकूण 20 विद्यार्थ्यांना प्रति रुपये 5000/- चे धनादेश, प्रमाणपत्र, शाल श्रीफळ, चषक द्वारे उद्घाटक मा कुमार आशीर्वाद मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आले.प्रास्ताविक विवेक नाकाडे शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी केले तसेच मा राजकुमार निकम शिक्षणाधिकारी माध्यमिक, मा विनय मत्ते प्राचार्य जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था यांनीही याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे संचालन वडपल्लीवार केंद्रप्रमुख व आभार प्रदर्शन श्री दुंपट्टीवार सा.प्र.अ यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विस्तार अधिकारी बालकृष्ण अजमेरा, अमरसिंग गेडाम मुख्याध्यापक चंद्रगिरीवार, राजू घोगरे, पारडवार, जिल्हा परिषद हायस्कूलचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, गटसाधन केंद्राचे अधिकारी, कर्मचारी इत्यादींनी परिश्रम घेतले.