विमा प्रतिनिधीचे ब्रम्हपुरी येथील एल. आय. सी कार्यालयासमोर देशव्यापी असहकार आंदोलन

127

विमा प्रतिनिधीचे एल आय. सी कार्यालयासमोर देशव्यापी असहकार आंदोलन

 

ब्रम्हपुरी : लाईफ इन्शुरन्स एजंट्स असोसिएशन ब्रम्हपुरी शाखेचे वतीने विमा एजंट व विमा ग्राहक यांच्या मागण्या मान्य करण्यात यावे यासाठी १ सप्टेंबर रोजी शाखेसमोर देशव्यापी असहकार आंदोलन करण्यात आले.

विमा पॉलिसी वरील बोनस वाढविणे बाबत, कर्जावरील व्याजदर कमी करण्यात यावे. विमा एंजटाला सन्मान पुर्वक वागणूक मिळण्यात यावे, विमा पॉलिसी वर जीएसटी बंद करण्यात यावे, विमा अभिकर्ता यांचे ग़्रंच्युटी मध्ये वाढ करण्यात यावे. अशा विविध मागणी साठी शाखेसमोर देशव्यापी असहकार आंदोलन करण्यात आले. यावेळी विमा अभिकर्ता यांनी सर्व प्रकारचे कामकाज बंद ठेवून आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी विमा अभिकर्ता यांचे कडून जोरदार नारे बाजी करण्यात आली. यावेळी आंदोलनात दोनशेहून अधिक अभिकर्ता सहभागी झाले होते. यावेळी अध्यक्ष चैतु ठाकरे, सचिव सतीश मेश्राम, कोषाध्यक्ष विलास दुपारी, उपाध्यक्ष रूपचंद झोडे,राजुभाऊ कामडी व ब्रम्हपुरी शाखेचे सर्व विमा अभिकर्ता मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here