विकासासाठी भाजपा महायुतीचे उमेदवार संजय जी पुराम यांना निवडून द्या आमदार तथा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. देवरावजी होळी
आमगाव – देवरी विधानसभा क्षेत्रात भाजपा महायुतीचे उमेदवार संजय जी पुराम यांच्या प्रचारार्थ कहाली, निंबा व रोंढा येथे कॉर्नर सभेला मार्गदर्शन केले
दि. 9 नोव्हेंबर 2024 सालेकसा
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या आदेशाने आमगाव – देवरी विधानसभा क्षेत्रातील सालेकसा तालुक्यातील कहाली, निंबा व रोंढा येथे कॉर्नर सभा घेण्यात आली. भाजपा महायुतीचे उमेदवार संजय जी पुराम यांच्या प्रचारार्थ विधानसभा क्षेत्रात मतदार सोबत जनसंवाद करून विकासासाठी माजी आ. संजय जी पुराम यांना निवडून देण्याचे आव्हान केले
याप्रसंगी तालुकाध्यक्ष गुमानसिह उपराडे, तालुका महामंत्री रवी हत्तीमारे, राजेंद्र बडोले, शालिनी बडोले, पंकज पनपालिया, प्रतीक राठी, सुरेखा साखरे, महेश साखरे, युवराज सांगोळे तसेच मतदार बंधू भगिनी उपस्थित होते.