लोकहितांचे प्रकल्प, स्थानिकांच्या विकासाला गती देण्यासाठी कीनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन आराखडा महत्वपूर्ण ठरेल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Cm eknath shinde)

159

लोकहितांचे प्रकल्प, स्थानिकांच्या विकासाला गती देण्यासाठी कीनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन आराखडा महत्वपूर्ण ठरेल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Cm eknath shinde)

Mumbai    मुंबई, दि. 3 :- ‘पर्यावरण रक्षण हे आपले कर्तव्यच आहे. पण लोकहितांचे विविध प्रकल्प तसेच स्थानिकांच्या विकासाला गती मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन आराखडा महत्वपूर्ण ठरेल,’ असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. महाराष्ट्र सागरी किनारा विकास प्राधिकरणाने तयार केलेला किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन आराखडा मुख्यमंत्री श्री. शिंदे यांना सादर करण्यात आला. पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठीचा हा किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन आराखडा केंद्रीय पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाकडे पाठवण्यास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली.

मंत्रालयात समिती सभागृहात झालेल्या प्राधिकरणाच्या बैठकीस महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर, पर्यावरण विभागाचे सचिव प्रवीण दराडे, वन विभागाचे प्रधान सचिव वेणु गोपाल रेड्डी, पशु संवर्धन विभागाचे प्रधान सचिव पराग जैन, पर्यटन विभागाचे सचिव सौरभ विजय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here