लाडक्या बहिणींनी उपमुख्यमंत्री देवाभाऊंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे,आ डॉ देवरावजी होळी

19

लाडक्या बहिणींनी उपमुख्यमंत्री देवाभाऊंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे,आ डॉ देवरावजी होळी

राज्यातील महायुतीचे सरकार लाडक्या बहिणींच्या पाठीशी

चामोर्शी येथे लाडक्या बहिणींचा मेळावा

महाविकास आघाडीची लाडक्या बहिणींचे १५०० रूपये बंद करण्यासाठी धडपड

दिनांक १९ सप्टेंबर गडचिरोली

राज्यातील महायुतीच्या सरकारने आपल्या लाडक्या बहिणींना दर महिन्याला १५०० रुपयांची भेट दिली. महायुतीचे सरकार लाडक्या बहिणींच्या पाठीशी आहे. परंतु महाविकास आघाडीची लाडक्या बहिणींचे १५०० रूपये बंद करण्यासाठी धडपड सूरू आहे .त्यामूळे येणाऱ्या काळात लाडक्या बहिणींनी आपल्या देवेन्द्रजी फडणविस (देवाभाऊंच्या) पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन आमदार डॉ देवरावजी होळी यांनी चामोर्शी येथे आयोजीत लाडक्या बहिणींच्या मेळाव्या प्रसंगी केले.राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या लाडक्या बहिणींचा मेळावा भारतीय जनता पार्टी तालुका चामोर्शीच्या वतीने चामोर्शी येथे आयोजित करण्यात आला. या मेळावाला तालुक्यातील लाडक्या बहिणीने मोठ्या संख्येमध्ये उपस्थिती दर्शविली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here