लाचखोर पोलीस हवालदार एसीबी च्या जाळ्यात 

175

https://youtube.com/watch?v=Ankorg3EQy8&feature=shareपोलीस हवालदार एसिबीच्या जाळ्यात

Gadchiroli-  police station   गडचिरोली पोलिस स्टेशन मध्ये कार्यरत पोलीस हवालदारास साडेतीन हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केल्याची घटना दिनांक तीन डिसेंबर शनिवारी घडली.   – श्री शकील बाबू सय्यद , वय 50 वर्ष, पोलीस हवालदार, ब. नं. 1775, वर्ग -3, पोलीस स्टेशन गडचिरोली ता. जिल्हा – गडचिरोली असे लाच घेताना अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तक्रारदाराचे आतेभावास गुन्ह्यात अटक करून जेलमध्ये न पाठवण्याचे व त्यास जमानत देण्याचे कामाकरीता 3500 रुपये रकमेची पंचासाक्षीदारा समक्ष लाचेची मागणी करून आरोपी पोलीस हवालदार यांनी तक्रारदार यांचेकडुन 3500 रू. लाचेची रक्कम पंचासमक्ष स्विकारली असुनसदर आरोपीला ला ताब्यात घेण्यात आले आहे. पोस्टे गडचिरोली येथे गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू.ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. राहुल माकणीकर , ला.प्र.वि. नागपूर .मा. श्री मधुकर गिते, अपर पोलीस अधीक्षक, ला प्र वि नागपूर. यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षक अधिकारी  मा. श्री. सुरेंद्र गरड, पोलीस उप अधीक्षक, ला. प्र. वि. गडचिरोली.पो.नि. श्रीधर भोसले, सफौ प्रमोद ढोरे, पोना राजेश पदमगीरवार, पोना श्रीनिवास संगोजी,पोशि किशोर ठाकूर, संदीप उडाण , संदीप घोडमोडे, मपोशि विद्या म्हशाखेत्री, चापोहवा तुळशीराम नवघरे सर्व ला.प्र.वि. गडचिरोली.यांच्या पथकाने केली.  सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजेंट) यांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमचेशी संपर्क साधावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here