लाचखोर तलाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात
गडचिरोली-
कोरची तालुक्यातील बेतकाठी येथील तलाठ्यास 15 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केल्याची घटना दिनांक 13 ऑक्टोबर गुरुवारी घडली.
नरेंद्र रामचंद्र ठाकरे वय 44 वर्ष कार्यालय साजा क्रमांक 9,बेतकाठी ता कोरची जि गडचिरोली रा. छत्तीसगडी मोहल्ला ता. कोरची असे लाचखोर तलाठ्याचे नाव आहे.
कोरची येथील 37 वर्षीय तक्रारदारास आरोपी तलाठ्याने 10 ऑक्टोबर रोजी सोडलेल्या टिप्परचे 10 हजार रुपये व टिप्पर ट्रॅक्टर ने बेतकाठी च्या कार्यक्षेत्रातून गिट्टी खदान माल वाहतूक करण्याचे कामाकरिता मासिक दहा हजार रुपये असे एकूण वीस हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाने गडचिरोली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. यानुसार आरोपी तलाठ्यास 15 हजार रुपये पंचासमक्ष स्वीकारताना अटक करण्यात आली. व कोरची पोलीस ठाण्यात गुन्हा नोदविण्यात आला.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूरचे मा.पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक श्री. मधुकर गीते यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गडचिरोली पोलिस उपअधीक्षक श्री सुरेंद्र गरड यांच्या पर्यवेक्षणाखाली पोलीस निरीक्षक शिवाजी राठोड, पोलीस निरीक्षक श्रीधर भोसले, पोलीस नाईक राजेश पदमगिरीवार, पो. ना. श्रीनिवास संगोजी, पो. शी संदीप उडाण,पो. शी. संदीप घोडमारे, चालक पो. ह. तुळशीराम नवघरे यांच्या पथकाने केली.