सतीश काबरा व प्रथम किसनलाल भय्या यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश
रा. काँ. चे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या ऊपस्थीती पक्ष प्रवेशस्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी पक्षाची बाजू भक्कम
गडचिरोली:_ येथील काबरा परिवारातील प्रसिद्ध सतीश काबरा व प्रथम किसनलाल भय्या हे सोमवार 16 जून रोजी असंख्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटात प्रवेश केले. त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गटाचे)पक्षाचे आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांनी “घडी” चिन्हाचे दुपट्टा टाकून जंगी स्वागत केले.
येथील सर्किट हाऊस मध्ये पक्ष प्रवेशाचे कार्यक्रम संपन्न झाले. ऐन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुक हंगामापूर्वी पक्ष प्रवेश झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)पक्षासाठी राजकीय वातावरण पोषक व अनुकूल बनले आहे. पक्ष प्रवेशाच्या वेळी प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर, युवक जिल्हाध्यक्ष लिलाधर भरडकर, अहेरी तालुकाध्यक्ष नागेश मडावी, जावेद अली, रतन दुर्गे होते.
मागील दहा दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अहेरी विधानसभा निर्वाचन क्षेत्राचे आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम हे जिल्हा पालथा घातले असून जिल्ह्यातील वेगवेगळ्या पक्षातील प्रमुख नेते व पदाधिकाऱ्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षात प्रवेशाची मालिका राबवित असल्याने पुढे होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)पक्षाची बाजू भक्कम बनली आहे.