राष्ट्रीय परिसंवादातून ज्ञानाचे संरक्षक: भारतीय ज्ञान प्रणालीचे जतन आणि संवर्धन करण्यात ग्रंथालयांची भूमिका स्पष्ट करण्याचा मानस…
महात्मा गांधी कला, विज्ञान व स्व. न. प. वाणिज्य महाविद्यालय आरमोरीचे आयोजन : मान्यवरांची उपस्थिती
आरमोरी(गडचिरोली) Armori – gadchiroli मनोहरभाई शिक्षण प्रसारक मंडळ, आरमोरी द्वारा संचलित महात्मा गांधी कला, विज्ञान व स्व. न. प. वाणिज्य महाविद्यालय, आरमोरी, राष्ट्रपिता महात्मा गांधी कला आणि विज्ञान महाविद्यालय, नागभीड जि . चंद्रपूर आणि रेणुका कॉलेज, बेसा, नागपूर याच्या ग्रंथालय विभागाच्या संयुक्त विद्यमाने ग्रंथालयशास्त्राचे जनक पद्मश्री डॉ एस. आर. रंगनाथन याच्या १३२ व्या जयंती निमित्याने एक दिवसीय ऑनलाईन राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन केले आहे.
सोमवार, दि. १२ ऑगस्ट रोजी सकाळी १०. ३० वाजता Google Meet या प्लॅटफॉर्म वरून होणार या राष्ट्रीय परिसंवादाचे उद्घाटन होणार आहे. ‘ज्ञानाचे संरक्षक: भारतीय ज्ञान प्रणालीचे जतन आणि संवर्धन करण्यात ग्रंथालयांची भूमिका’ या विषयावर आयोजित या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी मनोहरभाई शिक्षण प्रसारक मंडळ, आरमोरी चे सचिव मा. मनोजभाऊ वामनराव वनमाळी साहेब तर उद्घाटक म्हणून मा. अनिल प. कुलकर्णी , अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ महाराष्ट्र प्रांत माजी अध्यक्ष तथा व्यवस्थापन परिषद सदस्य, YCMOU नाशिक, तर निमंत्रक म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ लालसिंग खालसा उपस्थित राहतील.
पहिल्या सत्रात “आधुनिक शिक्षणामध्ये पारंपारिक ज्ञानाचे एकत्रीकरण” या विष्याकरिता मा. डॉ राजेंद्र एम. कुंभार, विभागप्रमुख, ग्रंथालय व माहितीशास्त विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे आणि दुसन्या सत्रात भारतीय ज्ञान प्रणाली चे शिकवणे, शिकणे आणि संशोधन सुलभ करण्यात ग्रंथालयाची भूमिका या विषयावर मा. डॉ कलापिनी अगस्ती संचालक, एमएसपी, कवी कुलगुरू संस्कृत विद्यापीठ, रामटेक ह्या मुख्य मार्गदर्शक राहतील,
या परिसंवादाला उपस्थित राहण्याचे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लालसिंग खालसा, प्राचार्य, डॉ गणपत देशमुख आणि प्राचार्य डॉ अतुल महाजन व आयोजक डॉ किशोर ना. वासुर्के डॉ रमणिक लेनगुरे व प्रा. चक्रधर भुर्रे व महाविद्यालयाच्या संशोधन व विकास विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.